शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘जातीव्यवस्था हा भारतासाठी मोठा शाप’

By admin | Updated: August 2, 2016 04:01 IST

‘स्व’ची ओळख, करिअरची निवड व निवडलेल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत असणे, ही त्रिसूत्री आपण जपली पाहिजे.

डोंबिवली : ‘स्व’ची ओळख, करिअरची निवड व निवडलेल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत असणे, ही त्रिसूत्री आपण जपली पाहिजे. आपल्या भारतात जातीव्यवस्था मोठा शाप आहे. ती संपेल तेव्हाच भारत जगात महासत्ता होईल, असा विश्वास चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केला. शिवसेना व कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्यातर्फे नुकताच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जिंकण्याची साधना’ हा मार्गदर्शनपर मेळावा अत्रे रंगमंदिरात झाला. या वेळी धर्माधिकारी बोलत होते. मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्रा. नरेशचंद्र, महापौर राजेंद्र देवळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.धर्माधिकारी म्हणाले की, आपल्याला कोणालाही ज्यांच्याकडे बुद्धी आहे, त्यांचा मत्सर आणि मला काही येत नाही, त्याचा न्यूनगंड वाटण्याची गरज नाही. आपल्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत होऊन भारतमातेची व देशाची सेवा घडो. राष्ट्रगीताचा सन्मान सर्वत्र राखला गेला पाहिजे.राज्यघटना व त्यामुळे मिळालेले मूलभूत अधिकारी हवेत, तर राष्ट्रप्रेम, कर्तव्य नाही का, असा सवालही त्यांनी केला. ज्यांचा मेंदू शाबूत आहे, तो प्रत्येक जण बुद्धिमान आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबर खेळ आणि कला याही बुद्धिमत्ताच आहेत. आपल्या बुद्धीचा कल आपण ओळखला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. (प्रतिनिधी)