शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या परिसरात जंक फूडवर बंदी

By admin | Updated: November 13, 2016 02:28 IST

पौष्टिक भाजी-पोळीऐवजी मसालेदार, चटपटीत जंक फूडवर मुलांच्या उड्या पडत असतात. त्यात पिझ्झा आणि बर्गर म्हणजे त्यांचा वीक पॉर्इंट. मात्र यामुळे त्यांच्या आरोग्यावर

मुंबई : पौष्टिक भाजी-पोळीऐवजी मसालेदार, चटपटीत जंक फूडवर मुलांच्या उड्या पडत असतात. त्यात पिझ्झा आणि बर्गर म्हणजे त्यांचा वीक पॉर्इंट. मात्र यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने खासगी व पालिका शाळांच्या शंभर मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी आणण्याची मागणी जोर धरु लागली आहे. अशी ठरावाची सुचना महापालिकेच्या महासभेपुढे मांडण्यात आली आहे. आई-वडील दोघंही नोकरदार असल्याने पाल्यांच्या खाण्यापिण्याकडे त्यांचेदुर्लक्षच होत असते. सकाळच्या वेळेत शाळा आणि कार्यालयासाठी तयारीच्या गडबडीत विद्यार्थ्यांना अनेकवेळा डब्ब्यात भाजी-पोळीऐवजी जंक फूड दिले जाते. बरीच मुले मधल्या सुट्टीत दुकानात जाऊन असे पदार्थ खातात. मात्र सतत जंक फूडचे सेवन केल्याने सुस्ती येणे, मेंदूचा विकास न होणे, लहान वयातच लठ्ठपणा येणे, मधुमेह अशा आजाराचे प्रमाण वाढत आहे.असे खाद्यपदार्थ विद्यार्थ्यांना शारीरिकदृष्ट्या हानीकारक असल्याचे भारतीय खाद्य सुरक्षा व मानांकन संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना डब्ब्यातून जंक फूड देऊ नयेत, असे पालकांना आवाहन करावे. तसेच खाजगी व पालिका शाळेच्या आसपास शंभर मीटर परिसरात जंक फूड विक्रीला प्रतिबंध करण्याची मागणी काँग्रेसचे परमिंदर भामरा यांनी पालिका महासभेपुढे ठरावाच्या सुचनेद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)जंक फूड म्हणजे काय?प्रक्रिया केलेले मसालेदार, चटपटीत खाद्यपदार्थ उदा. कॅण्डी, बेकरीचे पदार्थ, आईस्क्रीम, थंडपेय, पिझ्झा, बर्गर, फे्रंच फ्राईजसारख्या पदार्थांमध्ये पौष्टिक मूल्य नव्हे तर कॅलेरीज मात्र वाढतात. या खाद्यपदार्थांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कृत्रिम फ्लेव्हर वापरलेले असतात.देशाच्या राजधानीत बंदीदिल्ली सरकारने नुकतेच शाळेच्या ५० मीटर परिसरात जंक फूडच्या विक्रीवर बंदी आणण्याची तयारी केली आहे. शाळांमधील कॅन्टीनमध्ये जंक फूड ठेवू नये, अशी सुचनाही सरकारने केली आहे. काही खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डब्यातून पोळी-भाजी आणणे सक्तीचे केले आहे. आठवड्यातून एखाद्या दिवशी विद्यार्थ्यांना जंक फूड खाण्याची सूट दिली जाते.जंक फूडचे आरोग्यावर दुष्परिणामयाचा परिणाम मेंदूवर होत असल्याने स्मरणशक्ती आणि आकलनशक्ती कमी होत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.अति प्रमाणात पदार्थखाल्याने कालांतराने भुकेवर नियंत्रण राहत नाही. याचा परिणाम मेंदूच्याविकासावर होत असल्याने काही काळाने काय खाल्ले, किती खाल्ले आणि किती भूक लागली आहे, यावर नियंत्रण राहत नाही.रसायनिक बदल होऊन कालांतराने त्या व्यक्तीमधील उदासिनतेचे प्रमाण वाढते. साखरेचे प्रमाण अधिक व मेद वाढविणारे पदार्थ खाल्याने मेंदूच्या रसायनिक कार्यपद्धतीत बदल होतो. शरीरात मेदचे प्रमाण वाढल्यास उदासिनता वाढत असल्याचे समोर आले आहे.अधिरपणा वाढतो, जंक फूड खाण्याची इच्छा रोखता येत नाही, भूक नसतानाही वारंवार खात राहण्याचीइच्छा होते.