शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाण्यातील चिमुरडीचा पोवाड्यातून जागर !

By admin | Updated: January 12, 2015 01:55 IST

शाहिरी परंपरा जपत ऐतिहासिक महापुरुषांचा उलगडते जीवनपट.

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा : पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणार्‍या शाहिरी परंपरेत १३ वर्षांच्या चिमुरडीने नवीन अध्याय सुरू केला आहे. नावाप्रमाणेच बोलणं आणि वागणं असलेली कोमल जेव्हा खड्या आवाजात पोवाडे म्हणते, तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध होतात. महाराष्ट्राला शाहिरांची मोठी परंपरा लाभली आहे. लोककलेमध्ये मोडणार्‍या शाहिरीकडे तरुणपिढी फारशी आकर्षित होत नसल्याचे वास्तव आहे. चिखलीच्या मिसाळवाडी येथील मूळची असलेली कोमल शिक्षणानिमित्त बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथे आत्याकडे राहायला आली. तेथे गुरूदेव सेवामंडळाच्या संपर्कात आल्यानंतर तिने भजन, पोवाडे आदी कार्यक्रमात सहभाग घेतला. तिच्यातील पहाडी आवाज, पोवाडे म्हणण्याची विशिष्ट शैली, देहबोली हे गुण हेरुन शाहीर अशोक जाधव यांनी तिला शाहिरीचे बाळकडू देण्याचा निर्णय घेतला. शिक्षक के.ओ.बावस्कार, राजेंद्र कांबळे व गुरु अशोक जाधव यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, दलितमित्र पंढरीनाथ पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख आदींचा जीवनपट कवनातून मांडला आहे. या कवनास भारदस्त आवाजाचा साज चढवून कोमल हा जीवनपट श्रोत्यांसमोर लिलया उभा करते. तिने आतापर्यंत जिल्हास्तरीय युवा महोत्सव, शिवजयंती, जिजाऊ जयंती आदी कार्यक्रमांतून आपल्या शाहिरीची छाप उमटवली आहे. तिच्या या कर्तृत्वाची दखल घेत डी. एस. लहाने यांनी इयत्ता ८ ते १२ पर्यंतच्या शिक्षणासाठी तिला दत्तक घेतले आहे. *शाहिरी परंपरा चालवणार !राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आदींपासून ते कल्पना चावला, संगिता विल्यम्स आदींपर्यंत सर्वच महिलांनी वेगवेगळ्य़ा क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. छत्रपती शिवरायांच्या मराठी मुलुखात शाहिरीतच भविष्य घडविण्याचा मानस तिने बोलून दाखविला.