शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
3
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लान'
4
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
5
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
6
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
7
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
8
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
9
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
10
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
11
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
12
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
13
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
14
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
15
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
16
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
17
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
18
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
19
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
20
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
Daily Top 2Weekly Top 5

शास्तीकराची अद्यापही दुप्पट वसुली

By admin | Updated: July 12, 2017 03:31 IST

महापालिका निवडणुकीच्या काळात शास्ती रद्द झाल्याचा दावा करून शिवसेना व भाजपाने दिव्यात पेढे वाटले होते

अजित मांडके। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिका निवडणुकीच्या काळात शास्ती रद्द झाल्याचा दावा करून शिवसेना व भाजपाने दिव्यात पेढे वाटले होते. परंतु, अद्यापही ती रद्दच झाली नसल्याचे उघड झाले आहे. अनधिकृत बांधकामांवर दुप्पट शास्ती लावून मालमत्ताकराची वसुली सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असून, सत्ताधाऱ्यांनी मात्र, शास्तीनुसार वसुली सुरु नसल्याचे सांगितले. तर शास्तीबाबत अद्याप धोरण स्पष्ट झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे शासनाकडून शास्ती रद्द केल्याबाबतचे एक पत्रदेखील मालमत्ताकर विभागाला आले असून त्यावर कार्यवाही झालेली नाही. यामुळे प्रशासन, सत्ताधाऱ्यांमध्ये या विषयावरून सावळागोंधळ असल्याचे दिसत आहे.शहरातील अनधिकृत बांधकाम धारकांकडून मालमत्ताकराच्या दुप्पट रक्कम वसूल करण्याचे धोरण मागील काही वर्षे पालिका हद्दीत सुरु आहे. या विरोधात नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु होता. त्यातच निवडणुकीच्या काही दिवस आधी राज्य शासनाने ही दुप्पट शास्ती रद्द केल्याचे बॅनर दिवा भागात दोन्ही पक्षांनी लावले होते. परंतु प्रशासनाने त्यावेळी असे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान महासभेतदेखील या मुद्यावरुन रणकंदन माजले होते. त्यानंतर शास्ती न आकारता वसुली करण्याचा निर्णयही झाला होता. आतादेखील दुप्पट शास्ती आकारूनच वसुली होत असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. निवडणुकीच्या काळात केवळ मतांवर डोळा ठेवूनच सत्ताधाऱ्यांनी शास्ती रद्द झाल्याचा गवगवा केला होता. परंतु, प्रत्यक्षात तसे काही घडलेलेच नसल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. दुसरीकडे शास्तीबाबत सध्या काय धोरण आहे, याबाबतची कोणतीच माहिती नसल्याचे भाजपाने सांगितले. तर शिवसेनेने शास्तीसाठी प्रशासन कोणतीही जबरदस्ती करीत नसल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे प्रशासनाकडे महिन्याभरापूर्वी शास्ती रद्द केल्याबाबत शासनाकडून एक पत्र आल्याची माहिती मालमत्ताकर विभागाने दिली. या पत्रात शास्ती रद्द करण्याबाबत काही टप्पे सुचविले आहेत. त्यानुसार आता याबाबत आयुक्तांकडे चर्चा करुन त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती मालमत्ताकर विभागाचे प्रमुख ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.>मतांसाठी गवगवा?एक महिन्यापासून हे पत्र आले असतांनाही त्याची साधी भनकदेखील एकाही पक्षाला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या काळात केवळ मतांचा जोगवा मिळविण्यासाठीच शास्ती रद्द झाल्याचा गवगवा करण्यात आला होता. परंतु,आता त्याचे काय झाले शास्ती रद्द झाली की? नाही याची माहिती या पक्षांना नसल्याचे दिसले आहे. सध्यादेखील शास्ती लावूनच वसुली केली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ ती रद्द झाल्याचा गवगवा केला गेला होता. परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.- मिलिंद पाटील, विरोधी पक्षनेते, ठामपाशास्ती आकारूनच वसुली सुरु आहे. सत्ताधाऱ्यांनी केवळ मतांसाठीच निवडणुकीच्या काळात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही.- अविनाश जाधव,शहर अध्यक्ष, मनसेशास्तीसाठी कोणावरही दबाव आणला जात नाही, पालिकेकडून नियमानुसारच सध्या वसुली सुरु आहे, तसेच शास्ती रद्द करण्यासाठी पालकमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेतला होता.- नरेश म्हस्के, सभागृह नेते, ठामपाशास्तीबाबत सध्या काय परिस्थिती आहे, याची फारशी माहिती नाही. रद्द झाली हे खरे आहे. परंतु पुढे काय झाले याची माहिती नाही.-मिलिंद पाटणकर, गटनेते, भाजपापरिपत्रकाचा विसर?जानेवारी महिन्यातच या संदर्भात शासनाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार ६०० चौरस फुटांच्या घराकंडून शास्ती वसूल करु नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. तर १ हजार चौ.फुटांच्या घरांकडून ५० टक्के आणि १ हजार चौ. फुटांपासून पुढील घरांसाठी आहे त्याच पद्धतीने शास्ती वसूल करावी असे सांगण्यात आले आहे. मात्र, यावर काहीही कार्यवाही नाही.