शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांचा गणेशोत्सवात कोकणचा प्रवास सुकर

By admin | Updated: August 25, 2016 05:52 IST

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम व कोकण रेल्वेकडून विशेष फेऱ्या सोडल्या जातात.

मुंबई : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम व कोकण रेल्वेकडून विशेष फेऱ्या सोडल्या जातात. यंदा कोकणात आणि त्यामार्गे जाणाऱ्या २२६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. गणेशोत्सवात कोकणात जाताना मेल-एक्स्प्रेस गाड्यांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. तिकीट न मिळाल्याने अनेक प्रवासी उभ्याने प्रवास करतात. काहींना तर दोन डब्यांतील जागेमध्ये किंवा बाथरूमजवळही उभे राहावे लागते. प्रवाशांची वाढती मागणी पाहता आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नेहमीच विशेष फेऱ्यांचे नियोजन केले जाते. यंदा २२६ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, या सर्व ट्रेन चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडी, करमाळी, मडगावसाठी सोडण्यात येतील. एकूण फेऱ्यांपैकी २४ फेऱ्या या वांद्रे टर्मिनस आणि १४ फेऱ्या अहमदाबादसाठी व्हाया वसईमार्गे असल्याचे सांगण्यात आले. काही ट्रेन या फक्त गणेशोत्सवासाठीच असल्याने त्या ट्रेनला नव्याने क्रमांक देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ट्रेनची माहिती प्रवाशांना वेळोवेळी मिळावी, यासाठी स्थानकांवर उद्घोषणा करण्यात येणार आहे. तसेच पाण्याची व्यवस्था, रेल्वे पोलीस आणि काही स्थानकांवर रेल्वे कर्मचारीही मोठ्या प्रमाणात असतील, असे कोकण रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. (प्रतिनिधी)