शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्तावाढीसाठी ज्ञान प्रबोधिनीचा उपक्रम

By admin | Updated: November 15, 2015 02:20 IST

महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व पटसंख्या गळती कमी व्हावी, या उद्देशाने ‘शाळा गुणवत्ता विकसन प्रकल्प २०१५-१६’ राबविण्यात येत आहे.

सुवर्णा नवले-गवारे ,  पिंपरीमहापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व पटसंख्या गळती कमी व्हावी, या उद्देशाने ‘शाळा गुणवत्ता विकसन प्रकल्प २०१५-१६’ राबविण्यात येत आहे. निगडीतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून, महापालिकेच्या १० शाळा गुणवत्तावाढीसाठी दत्तक घेतल्या आहेत. ज्ञान प्रबोधिनीचे तज्ज्ञ शिक्षक या १० शाळांत जाऊन रोज दोन तास विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय सोपा करून सांगत आहेत. मनपा शाळा गुणवत्ता विकसन प्रकल्पाची सुरुवात १५ आॅगस्टला झाली आहे. प्रत्येक शिक्षकाकडे आठ महिन्यांचे ६४ तासांचे अभ्यासवर्ग आहेत. दोन वर्षांच्या कालावधीकरिता हा प्रकल्प राबविला जाणार आहे. खासगी शाळांप्रमाणेच महापालिका शाळांची गुणवत्ता वाढणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाने दत्तक शाळांसाठी व्यवस्थापन समिती, सहविचार समिती व समन्वयकाची समिती स्थापना केली आहे. संबंधित शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पालक समाधान व्यक्त करीत आहेत, असे निगडीतील ज्ञान प्रबोधिनी केंद्राचे उपप्रमुख मनोज देवळेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.