शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

झुलला बाई रामझुला...

By admin | Updated: December 8, 2014 01:01 IST

गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने नागरिकांना झुलवत असलेल्या रामझुल्याचा वनवास अखेर रविवारी संपला. रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

उद्घाटन : अखेर १५ वर्षांचा वनवास संपलानागपूर : गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने नागरिकांना झुलवत असलेल्या रामझुल्याचा वनवास अखेर रविवारी संपला. रामझुल्याच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूरचा चेहरामोहरा बदलणार, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबई येथील वांद्रे-वरळी समुद्रसेतूनंतर ‘केबल’च्या आधाराने बनलेला रामझुला हा राज्यातील एकमेव पूल आहे, हे विशेष.राज्यातील नवीन सरकार येत्या पाच वर्षांत नागपूरचा चेहरामोहरा बदलून टाकेल. मागेल त्यापेक्षा जास्त या शहराला मिळेल. नागपूरने आता मागे वळून पाहण्याची आवश्यकता नाही. येथील इतर विकास कामे लवकर मार्गी लागावीत यासाठी महानगरपालिकेला १०० कोटी रुपये देण्याची गरज आहे व त्याची फाईल तयार झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूर सुधार प्रन्यासकडे ८०० कोटींच्या ठेवी आहेत. यावर व्याज खाण्याचे दिवस गेले असून हे पैसे नागपूरच्या विकासासाठी लावण्याची गरज आहे. शिवाय ‘एलबीटी’ लवकरच रद्द करणार असून नवीन पर्यायामुळे महानगरपालिकेला योग्य अनुदान मिळेल, असेदेखील ते म्हणाले. भूमिपूजनही युती सरकारच्याच काळात‘एमएसआरडीसी’ने (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) हा पूल बांधला आहे. परंतु सध्या महामंडळाची आर्थिक स्थिती खालावली आहे. याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. या पुलाचे भूमिपूजन युती सरकारच्या काळात झाले होते व उद्घाटनदेखील युती सरकारच्याच काळात झाले, असे गडकरी म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, ‘एमएसआरडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, महापौर प्रवीण दटके, महानगरपालिका आयुक्त श्याम वर्धने, पोलीस आयुक्त के.के. पाठक हे प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हा उड्डाणपूल लगेच रहदारीसाठी मोकळा करण्यात येईल, अशी घोषणा अधिकाऱ्यांनी केली.(प्रतिनिधी).