शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरीगडाची सुरक्षाव्यवस्था ‘खंडोबाभरोसे’

By admin | Updated: August 17, 2016 01:11 IST

जेजुरीतील कुलदैवत खंडोबा मंदिर व गडकोट आवारामध्ये प्रवेश करणाऱ्या भाविकभक्तांची सुरक्षाव्यवस्था केवळ ‘खंडोबाभरोसे’ असल्याचा प्रत्यय पोलीस यंत्रणेला आला.

जेजुरी : जेजुरीतील कुलदैवत खंडोबा मंदिर व गडकोट आवारामध्ये प्रवेश करणाऱ्या भाविकभक्तांची सुरक्षाव्यवस्था केवळ ‘खंडोबाभरोसे’ असल्याचा प्रत्यय पोलीस यंत्रणेला आला. सुटीच्या दिवसाचा योग साधून सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी गडावरील सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. या वेळी त्यांना सुरक्षा यंत्रणेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. या त्रुटी कमी करण्याच्या दृष्टीने त्यांनी सूचना केल्या. रविवारी तसेच शासकीय सुटीच्या दिवशी भाविकांची देवदर्शनासाठी रीघ लागलेली असते. सध्या श्रावण महिना व सलग तीन दिवस सुट्या आल्याने भाविकांची गर्दी अधिक होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत काही तक्रारी आल्याने ही पाहणी करण्यात आली. गडकोट आवारामध्ये लाखो रुपये खर्च करून ४० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ४ महिलांसह २२ सुरक्षारक्षक सेवेत असल्याचे सांगितले जाते. तर, ८ शिपाई आहेत. गडावर प्रवेश करण्यासाठी उत्तर बाजूच्या मुख्य प्रवेशद्वारासह पूर्व व पश्चिम दिशेला असलेल्या मार्गावर डोअर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. मात्र, तरीही खिसेकापू व दागिने चोरीच्या घटना सर्रास घडतात. माघपौर्णिमा, चैत्रपौर्णिमा, सोमवती अमावास्या व दसरा या यात्रांव्यतिरिक्त रविवारी व गर्दीच्या वेळी उत्तर दरवाजासह इतर दोन मार्गांवर मेटल डिटेक्टर असले, तरी तेथे कोणीही सुरक्षारक्षक नसतो. वास्तविक, गडकोटांतील तिन्ही मार्गांवर प्रत्येकी एक महिला व एक पुरुष सुरक्षारक्षक हातात मेटल डिटेक्टर घेऊन असायला हवा; मात्र ते दिसून येत नाहीत. पोलीस अधिकारी अथवा वरिष्ठांनी याबाबत विचारणा केली असता जेवणासाठी गेलो होतो अथवा वाट्टेल ती जुजबी कारणे सांगून वेळ मारून नेली जाते. विशेष म्हणजे, हातातील मेटल डिटेक्टर यंत्र चार्जिंग करून घ्यावे लागते, याचेही भान येथील कर्मचाऱ्यांना नव्हते, असे पाहणीच्या वेळी निदर्शनास आले. पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक श्रीकांत देव यांनी रविवारी (दि. १४) मंदिराला भेट देऊन पाहणी केली. गडाच्या ३ प्रमुख प्रवेशमार्गांवर डोअर मेटल डिटेक्टरमधूनच भाविकांनी प्रवेश करावा. एक महिला व एक पुरुष सुरक्षारक्षक यांनी हातातील मेटल डिटेक्टरने प्रत्येक भाविकाची तपासणी करून गडाच्या आवारात त्याला प्रवेश द्यावा. उत्तर दिशेकडून प्रवेश देताना देवदर्शन झाल्यानंतर पश्चिम दिशेकडून भाविकांनी बाहेर पडावे. तिन्ही प्रवेशद्वारांवर महिला व पुरुष सुरक्षारक्षक असावेत. हातातील व डोअर मेटलडिटेक्टर यंत्रणेची वेळोवेळी दुरुस्ती करून घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. 'व्हीआयपी' म्हणून आलेल्या मर्जीतील लोकांना खास मंदिरप्रवेशद्वारातून नेऊन देवदर्शन घडविले जाते. तासन् तास लहान मुले घेऊन दर्शनरांगेत उभ्या असलेल्या भाविकांची यामुळे गैरसोय होते. व्यवस्थापनातील कर्मचारी व मंदिरातील सेवेकरी यांना हाताशी धरूनही किंवा विश्वस्तांची ओळख सांगून हा प्रकार सुरू असल्याने गर्दीच्या काळात व्यवस्थापन कोलमडते. (वार्ताहर)