शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

जेजुरी गड बनतेय पर्यटन केंद्र!

By admin | Updated: February 15, 2015 01:13 IST

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाचा जेजुरी गड परिसर आता पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत असून, वनखात्यातर्फे डोंगर सुशोभिकरण आणि वक्षारोपण करण्यात येत आहे़

बी.एम.काळे - जेजुरी (जि़पुणे) महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाचा जेजुरी गड परिसर आता पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत असून, वनखात्यातर्फे डोंगर सुशोभिकरण आणि वक्षारोपण करण्यात येत आहे़ जेजुरी हे तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटन केंद्र्र म्हणून विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. गेल्या वर्षी तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते जेजुरी गडालगतच्या २३ हेक्टर क्षेत्रावरील वृक्षारोपण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ झाला. यात २० हजार वृक्षांची लागवड करणे, बालोद्यानाची निर्मिती, भाविकांना बसण्यासाठी झाडाभोवती ओटे बांधणे, पॅगोडा, निसर्ग निर्वाचन (अभ्यास) केंद्र उभारणे, वन्य प्राण्यांसाठी पाणवठे, वृक्षारोपणाबारोबरच डोंगर सुशोभीकरण, भाविकांना निसर्ग परिक्रमा करण्यासाठी पथ, रोपवनाला कुंपण आदी कामे केली जाणार आहेत. उद्यानतज्ज्ञ सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात येथे वड, पिंपळ, लिंब, गुलामोहर, आपटा, चिंच, कांचन आदी सुमारे ६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. निसर्गप्रेमीसाठी वन खात्याकडून दोन ठिकाणी पॅगोडा उभारला आहे. डोंगर पायवाटा तयार करण्यात आलेल्या आहेत, रोपवनाला कुंपण घालाण्याचेही काम सुरू आहे. राज्याचे मुख्य वन सचिव विकास खारगे यांनीही भेट देऊन या कामाची पाहणी केली आहे.जेजुरीगड उंच डोंगरावर असून, तेथून पुढे दीड किलोमीटर जयाद्र्रीच्या डोंगररांगांत खंडोबा देवाचे मूळ ठिकाण कडेपठार मंदिर आहे. जेजुरीला येणारे भाविक गडावरील देवदर्शन घेतल्यानंतर डोंगरातील कडेपठार मंदिरातही जातात. कडेपठार आणि जेजुरीगड यांच्यामधील डोंगर हा वन खात्याच्या मालकीचा असल्याने वन खात्याने तीर्थक्षेत्र जेजुरीचा पर्यटन ठिकाण म्हणूनही विकास करण्यासाठी हा संपूर्ण डोंगरच विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.