शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

जीन्स हे ‘बॉम्बे कल्चर’ आहे का?

By admin | Updated: March 30, 2017 04:25 IST

जीन्स, टी-शर्ट घालून न्यायालयात वावरणे, हे ‘बॉम्बे कल्चर’ (बॉम्बे हायकोर्टाचे) आहे का? अशी विचारणा

मुंबई : जीन्स, टी-शर्ट घालून न्यायालयात वावरणे, हे ‘बॉम्बे कल्चर’ (बॉम्बे हायकोर्टाचे) आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या पत्रकारांना केली. उच्च न्यायालयाच्या या प्रश्नामुळे नाराज झालेल्या पत्रकारांनी लगेचच कोर्टरूम सोडले.डॉक्टर संपप्रकरणी सुनावणी सुरू असताना, मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांनी अचानकपणे केलेल्या या प्रश्नाने कोर्टरूममध्ये उपस्थित असलेले पत्रकार अवाक् झाले. डॉक्टर संपाविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील गेल्या सुनावणीत आपण केलेल्या भाष्याचा विपर्यास करण्यात आला, अशी तक्रार मुख्य न्या. चेल्लुर यांनी थेट पत्रकारांकडे केली. या तक्रारीनंतर सुनावणी सुरू झाली. मात्र, अचानकपणे मुख्य न्यायाधीशांनी जीन्स, टी-शर्ट घातलेल्या पत्रकाराला अशा प्रकारे जीन्स, टी-शर्ट घालून न्यायालयात वावरणे हे ‘बॉम्बे कल्चर’ (बॉम्बे हायकोर्टाचे कल्चर) आहे का? अशी विचारणा केली. तुम्हीसुद्धा न्यायालयाची सभ्यता पाळणे आवश्यक आहे, असे मुख्य न्या. चेल्लुर यांनी म्हटल्यावर पत्रकारांनी काहीही न बोलता कोर्टरूम सोडणे पसंत केले. (प्रतिनिधी)