शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार सेलवास प्रवास धोक्याचा

By admin | Updated: April 30, 2016 03:34 IST

जव्हार तालुक्यातील वडोली गावा जवळील रातून पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धोकादायक स्थितीत आहे.

जव्हार : जव्हार तालुक्यातील वडोली गावा जवळील रातून पूल गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धोकादायक स्थितीत आहे. या रातूना पुलाला ७२ वर्ष उलटून गेल्याने, हा पूल दुरुस्तीच्या कामाचा राहीलेला नसल्याने, रातूना येथील धोकादायक पुलाच्या कामाला मजुरी देऊन, नवीन पूल बांधण्याची रातूना व वडोली ग्रामस्थांनी मागणी केली आहे.तालुक्यातील वडोली ग्रामपंचायत हद्दीतील रातूना पाड्याजवळ सेलवास रोडवर गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस व नादुरुस्त असा धोकादायक स्थितीत जव्हार सेलवास मेन रोडवर पूल आहे. या धोकादायक पुलावरून रोज हजारो वाहने ये-जा करीत असून, अवजड वाहनेही चालू आहेत. या पुलाच्या दोन्ही बाजू मोडकळीस आले आहेत. या पुलाचे आधार मोडून पडले आहेत. त्यातच अरुंद पूलामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. या धोकादायक पूलाचे वेळेत काम न झाल्यास याचा फटका स्थानिक रहिवासी, रोज येणारी अवजड वाहने, यांना बअसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, मोठी अडचण होणार आहे. हा रातूना पूल लेंदी नदीवर असल्याने धोका वाढला आहे. (वार्ताहर)जव्हार सेलवास रोडवरील रातूना पुलाची दुरुस्ती व नवीन पूल बांधण्यासाठी येथील ग्रामस्थानी सतत मागणी केली आहे. मात्र शासनाने हा पूल वेळीच दुरुस्ती किवा नवीन बांधकाम न केल्यास दुर्घटना होऊन शकते, असे भयानक चित्र या मेन रोडवरील पुलाचे दिसत आहे.