शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

जाट, पटेलांचा मेनू फॉर्म्युला राबवू -नितेश राणे

By admin | Updated: May 27, 2016 21:56 IST

आरक्षणाच्या मुद्यावर जाट आणि पटेलांचे आंदोलन पाहिले़ देशपातळीवर त्यांच्या उग्र आंदोलनाची दखल घेतली गेली़.

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 27 - आरक्षणाच्या मुद्यावर जाट आणि पटेलांचे आंदोलन पाहिले़ देशपातळीवर त्यांच्या उग्र आंदोलनाची दखल घेतली गेली़. तोच मेनू फॉर्म्युला आपण राबवू़ आम्ही निवेदने का देत बसावेत ? असे स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, कणकवलीचे आमदार नितेश राणे म्हणाले. मराठा आरक्षण मेळाव्यानंतर शासकीय विश्रामगृहावर बोलावलेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधत असताना त्यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना जाट, पटेल मेनू फार्म्युला स्पष्ट केला. याच प्रश्नावर कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीची आठवण करुन देत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप, सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्व पक्षांतील पदाधिकारी आपल्यासोबत असल्याचे सांगितले़ नाशिकमधील मेळाव्यातही अशाप्रकारे सर्वच पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत आल्याचे सांगितले़ कोणत्या झेंड्याचा रंग घेऊन मैदानात उतरलो नसल्याचेही सांगून राज्यभरात अजून १५ मेळावे होतील आणि त्याक्षणी मराठा समाज पेटलेला दिसेल म्हणाले. सोलापुरातील महानगरपालिका निवडणुकीच्या मुद्यावर बोलताना लोकांच्या मागणीचा विचार करुन संघटनेच्या पदाधिकाऱ्याला काँग्रेस तिकीट देईल म्हणाले़ शिवसेनेविषयी छेडले असता ह्यशिवसेनेचा वाघ गल्लीगल्लीतून संपल्याचीह्ण टीका केली़ ग्रामीण भागात काँग्रेसबद्दल चांगले मत आहे़ मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत़ बेकारी वाढत आहे़ दिवस कसला साजरा करताय? अशी बोचरी टीकाही राणे यांनी केली़. संघटन मजबुतीवर बोलताना सुभाष पाटीलसारखा प्रामाणिक कार्यकर्ता काळाआड गेल्याचे दु:ख व्यक्त करत तसेच कार्यकर्ते पुढील काळात मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले़ मंत्रालयातील सचिवाचे लाचप्रकरण आणि एकनाथ खडसे प्रकरणावर भाष्य करताना सरकारचे कोणावरही अंकुश नसल्याचे म्हणाले़ गृहविभागही सक्षम नसल्याचे सांगून काँग्रेसला सडेतोड, आक्रमक अशा नारायण राणेंसारख्या व्यक्तीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.