शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शिवडी-न्हावाशेवा सेतूसाठी मुख्यमंत्र्यांची जपान वारी

By admin | Updated: August 11, 2015 02:02 IST

मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. प्रकल्पासाठी जापानच्या ‘जायका’चे (जपानी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी)

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. प्रकल्पासाठी जापानच्या ‘जायका’चे (जपानी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन एजन्सी) अर्र्थसाहाय्य घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपानचा दौरा करणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा २००९ साली करण्यात आली होती. तब्बल २२ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी सागरी सेतूने मुंबई आणि नवी मुंबईला जोडण्याची योजना होती. मात्र, कधी निविदा प्रक्रिया तर कधी भूसंपादन अशा विविध कारणांमुळे प्रकल्पाचे गाडे अडले होते. राज्यातील बहुतांश पायाभूत प्रकल्पांना अर्थसाहाय्य करणाऱ्या जायकाने या प्रकल्पात रस दाखविल्यामुळे प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. जायकाने या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेबाबतचे सर्वेक्षणही पूर्ण केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी सांगितले, ‘मुंबई महानगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रकल्प रखडला होता. प्रकल्पासाठी जायकाचे अर्थसाहाय्य घेण्याचे राज्य सरकारने नक्की केले आहे. ८ ते १३ सप्टेंबरदरम्यान मुख्यमंत्री जपान दौऱ्यावर असून, या वेळी या प्रकल्पाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.’ मुख्यमंत्र्यांच्या जपान दौऱ्यात त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाचे अनावरणही केले जाणार आहे. मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या चीन दौऱ्यामुळे जपान दौरा लांबणीवर पडला होता. चीनसह अन्य काही देशांनीही या प्रकल्पात रस दाखवला होता. सहा पदरी सागरी सेतूचे काय मिळणार फायदे?२२ किमी लांबीच्या सहा पदरी सागरी सेतूने मुंबई व नवी मुंबईला जोडण्यात येईल.नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील विकासाचे मार्ग या सागरी सेतूमुळे खुले होणार आहेत. नवी मुंबईतील प्रस्तावित आंतराष्ट्रीय विमानतळ गाठणे या मार्गामुळे अधिक सुकर होणार आहे.