शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जानकर यांच्या कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2016 06:15 IST

भगवानगड येथील कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे/परळी (बीड) : भगवानगड येथील कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्त व्याचे राज्यात पडसाद उमटले. वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जानकर यांच्या हिंगणे येथील कार्यालयाची मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तोडफोड केली. रासपचे प्रदेश सचिव बाळासाहेब कोकरे यांच्या पत्नी व मुलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.जानकर यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर आक्रमक भाषेत टीका केली. त्यांच्या या वक्त व्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष रूपाली चाकणकर व इतर कार्यकर्त्यांनी हिंगणे येथील रोकडोबा मंदिराजवळच्या जानकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. जानकर यांचे कार्यालय बंद असल्याने फलकाची मोडतोड करण्यात आली. सुमारे अर्धा तास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निर्दशने सुरू होती. जानकर यांची भाषा मंत्रिपदाला शोभणारी नाही, त्यांनी पुन्हा अशी वक्त व्ये केली तर त्याला चोख उत्तर देण्यात येईल, असे चाकणकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)जानकर यांना राष्ट्रवादीअद्दल घडविणार भगवान गडावर जानकर यांनी शरद पवार व अजित पवार यांच्यावर ज्या भाषेत टीका केली, ती राज्याचे सुसंस्कृत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का याचा खुलासा त्यांनी करावा. जानकर पुण्यात कधी येतात, याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांच्या भाषणाचा त्यांना पश्चाताप होईल अशी अद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून घडविली जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिला आहे. परळीत पुतळा जाळलाजानकर यांनी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरल्याच्या निषेध करत परळीत (बीड) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन केले. जानकरांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.