शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
3
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
4
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
5
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
6
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
7
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
8
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
9
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
10
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
11
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
12
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
13
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
14
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
15
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
16
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
17
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
18
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
19
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
20
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!

जननीच करू शकते तेजस्वी हिंदूराष्ट्राची निर्मिती

By admin | Updated: September 29, 2014 01:05 IST

मातृहृदयाने स्पर्श केल्यास समोरच्या व्यक्तीत बदल घडून येतो. जननीमध्ये शक्ती आहे. त्यामुळे तेजस्वी हिंदूराष्ट्राची निर्मिती जननीच करू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका

शांताक्का : राष्ट्रसेविका समितीचा विजयादशमी उत्सव उत्साहातनागपूर : मातृहृदयाने स्पर्श केल्यास समोरच्या व्यक्तीत बदल घडून येतो. जननीमध्ये शक्ती आहे. त्यामुळे तेजस्वी हिंदूराष्ट्राची निर्मिती जननीच करू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी आज येथे केले.सेवासदन समितीच्या परिसरात आयोजित राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी उत्सवात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. व्यासपीठावर डॉ. अनुराधा रिधोरकर, राष्ट्रसेविका समितीच्या विदर्भ कार्यवाहिका सुलभा गौड, नागपूर महानगर कार्यवाहिका करुणा साठे, अखिल भारतीय सह शारीरिक प्रमुख मनिषा संत, पूर्व प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे उपस्थित होत्या. शांताक्का म्हणाल्या, डॉक्टर जसे प्रेमाने आजारी व्यक्तीला स्पर्श करून त्याचा अर्धा आजार दूर करतात. त्याच प्रमाणे जननी सुद्धा राष्ट्राची निमिर्ती आपल्या मातृत्वभावाने करू शकते. त्यासाठी धैर्य ठेऊन अन्यायाला विरोध करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. अनुराधा रिधोरकर म्हणाल्या, आजही अनेक निर्भया बळी जात असून स्त्री सबला झालेली नाही. राष्ट्रसेविका समितीचे आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य महान आहे. हातात हात घालून पुढे जाणे हेच खरे स्त्रीत्व आहे. कुटुंबात मुलांचे ऐकून घेणे गरजेचे असून घरातील आई शिस्तप्रिय असायला हवी. मुलांनी जंक फूड टाळून आठवड्यातून किमान तीन दिवस पायी चालण्याची गरज आहे. स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी महिलांची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी विविध आत्मरक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझीम, दंडयोग, योग चापाचे प्रात्यक्षिक, ध्वज संचलन, सांघिक योग, सांघिक गीत सादर केले. संचालन डॉ. लीना गहाने यांनी केले. कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)