शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

पुरूषात जळगाव, तर महिलात रत्नागिरी विजयी

By admin | Updated: January 13, 2015 00:19 IST

राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा : राष्ट्रीय स्पर्धा गोव्यात- महिला व पुरुष दोन्ही गटांतील अंतिम सामने चुरशीचे झाले

सांगली : अनुभवी जळगाव संघाने वेगवान खेळ करत ठाणे संघाचा पराभव करीत पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले. महिलांमध्ये चपळ रत्नागिरी संघाने सोलापूरला धक्का देत विजयश्री खेचून आणली. यजमान सांगली जिल्ह्यास मात्र तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. सांगली जिल्हा बेसबॉल असोसिएशन व फिनिक्स स्पोर्टस् अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्ममाने नवव्या वरिष्ठ राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये पार पडल्या. आक्रमक फटकेबाजी व बचावाचे कौशल्यपूर्ण तंत्र या स्पर्धेत पहावयास मिळाले. सोलापूर, सांगली, नागपूर, रत्नागिरी, जळगाव, ठाणे आदी संघ प्रारंभीपासूनच आघाडीवर होते. महिला व पुरुष दोन्ही गटांतील अंतिम सामने चुरशीचे झाले. विजेत्या संघांना नगरसेवक गजानन मगदूम यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र इखणकर होते. स्पर्धा समितीचे सचिव राजेंद्र कदम यांनी स्वागत केले़ उदय गायकवाड यांनी आभार मानले. महाराष्ट्र बेसबॉल संघाच्या महिला संघ प्रशिक्षकपदी प्रा. दीपक राऊत यांची निवड झाली. यावेळी विजय बोरकर, अशोक सरोदे, किरण पवार, आर्यदीप लोंढे, सुरेश हादीमणी, जितेंद्र पाटील, मदन दाभाडे, ज्ञानेश काळे, मुन्ना आलासे आदी उपस्थित होते. या स्पर्धेतून निवडलेला महाराष्ट्राचा संघ गोवा येथील राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे राजेंद्र कदम यांनी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)