शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव - बालेकिल्ल्यात स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी

By admin | Updated: October 21, 2016 22:47 IST

शासनाच्या विरोधातील संताप, स्थानिक प्रश्नांचे मुद्दे घेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत नंबर वन पक्ष व्हावा यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २१ : शासनाच्या विरोधातील संताप, स्थानिक प्रश्नांचे मुद्दे घेत राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपालिका निवडणुकीत नंबर वन पक्ष व्हावा यासाठी व्यूहरचना सुरू केली आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे त्या ठिकाणी स्वबळावर तर अन्य ठिकाणी आघाडी करण्यावर पक्षाचा भर राहणार आहे.

पाच नगरपालिकांमध्ये सत्ताधारीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सध्या पारोळा, चाळीसगाव, फैजपूर, सावदा व भुसावळ नगरपालिकेत सत्ताधारी पक्ष आहे. धरणगाव नगरपालिकेची सत्ता एका मताने तर चोपड्याची सत्ता चिठ्ठीमुळे राष्ट्रवादीच्या हातातून गेली होती. १३ नगरपालिकांपैकी सात नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत नंबर वन पक्ष रहावा यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहे.आजी-माजी आमदारांवर जबाबदारीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १३ नगरपालिकांची जबाबदारी ही आजी-माजी आमदारांवर सोपविली आहे. पारोळा व एरंडोलची जबाबदारी जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ.सतीश पाटील,धरणगावची माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, चाळीसगावसाठी माजी आमदार राजीव देशमुख, पाचोऱ्याची जबाबदारी दिलीप वाघ, चोपड्याची माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, रावेर, यावल, सावदा, फैजपूरची जबाबदारी माजी आमदार अरुण पाटील, बोदवडची जबाबदारी अ‍ॅड.रवींद्र पाटील, भुसावळची जबाबदारी विजय चौधरी व उमेश नेमाडे यांच्याकडे तर अमळनेरची जबाबदारी माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यावर सोपविली आहे.महागाई, शेतमालाचे भाव प्रचाराचे मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरपालिका निवडणुकीत राज्य व केंद्रात भाजपा सरकार आल्यानंतर महागाईमधील वाढ, शेतकऱ्यांच्या मालाला मिळालेले कवडीमोल भाव तसेच मराठा आरक्षण हे विषय प्रचारासाठी घेण्यात येणार आहे. यासोबतच नगरपालिकास्तरावरील स्थानिक प्रश्न प्रचारात घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ठिकाणी प्रबळ आहे, तेथे स्वबळावर तर काही ठिकाणी समविचारी पक्षासोबत आघाडी होईल. माजी आमदारांवर जबाबदारी सोपविली आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष नंबर वन राहिल असा विश्वास आहे. डॉ.सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.