शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

‘जय महाराष्ट्र’:मुंबई-बेळगाव एसटी धावली

By admin | Updated: June 3, 2017 04:09 IST

एसटीच्या नवीन बोधचिन्हासह ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्याचा समावेश असलेली ‘मुंबई-बेळगाव’ ही पहिली एसटी शुक्रवारी सकाळी बेळगावच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटीच्या नवीन बोधचिन्हासह ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्याचा समावेश असलेली ‘मुंबई-बेळगाव’ ही पहिली एसटी शुक्रवारी सकाळी बेळगावच्या दिशेने रवाना झाली. एसटीचे नियोजन व पणन विभागाचे महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवला.मुंबई सेंट्रल आगार येथून मुंबई-बेळगाव ही एसटी सकाळी ७.३० वाजता मार्गस्थ करण्यात आली. यावेळी रत्नपारखी यांच्यासह कामगार प्रतिनिधी श्रीरंग बरगे हेदेखील उपस्थित होते. मुंबई-बेळगाव एसटीचे पुणे-सातारा-कराड येथे स्वागत होणार असल्याची माहिती एसटीच्या वतीने देण्यात आली. कर्नाटक येथील मंत्र्यांनी ‘जय महाराष्ट्र’ या घोषवाक्यामुळे वादंग निर्माण केला होता. यावर परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटीच्या सर्व बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहिण्याचे आदेश दिले. त्यानुसार, एसटीच्या ६९व्या वर्धापन दिनी एसटीच्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या बोधचिन्हात जय महाराष्ट्रचा समावेश करण्यात आला आहे. नवीन बोधचिन्हासह पहिली बस मुंबई-बेळगाव या मार्गावर मार्गस्थ करण्यात आली. लवकरच एसटी ताफ्यातील सर्व बसवर नवीन बोधचिन्ह लावण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.