शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी गडकरचे लायसन्स रद्द

By admin | Updated: September 17, 2015 02:12 IST

ईस्टर्न फ्री वे अपघातातील आरोपी जान्हवी गडकरला आरटीओकडून लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसविषयी गडकरकडून करण्यात आलेला खुलासा असमाधानकारक

मुंबई : ईस्टर्न फ्री वे अपघातातील आरोपी जान्हवी गडकरला आरटीओकडून लायसन्स रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसविषयी गडकरकडून करण्यात आलेला खुलासा असमाधानकारक असल्याने अखेर वडाळा आरटीओकडून जान्हवी गडकरचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ९ जूनच्या मध्यरात्री दीडच्या सुमारास ईस्टर्न फ्री वेवरून विरुद्ध दिशेने जाताना दारूच्या नशेत असलेल्या जान्हवी गडकरच्या आॅडी कारने एका टॅक्सीला जोरदार धडक दिली. यात दोन जणांचा मृत्यू तर तीन जण जबर जखमी झाले. जान्हवी गडकरने केलेल्या अपघाताचे स्वरूप गंभीर असल्याने लायसन्स रद्द करण्याविषयी वडाळा आरटीओकडून अपघात झाल्यानंतरच तिसऱ्या दिवशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र गडकर ही अटकेत असल्याने त्या नोटीसला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे जामीन मिळताच वडाळा आरटीओकडून दुसऱ्यांदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु ही नोटीस उशिरा मिळाल्याने त्याला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी गडकरकडून करण्यात आली होती. अखेर १0 सप्टेंबर रोजी जान्हवी गडकरकडून नोटीसला उत्तर देताना न्यायालयात खटला सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे नुसत्याच एफआयआरवरून लायसन्स रद्द करण्यात येऊ नये, अशी विनंती केली. याबाबतच्या कायद्याचे ज्ञान असूनही मद्यपान करून वाहन चालवून प्राणघातक अपघातास कारणीभूत झाल्याचा वस्तुस्थितीचा विचार करून गडकर यांचा खुलासा असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच दोन इसमांच्या मृत्यूसाठी कारणीभूत आणि बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल लायसन्स रद्द करण्यात आल्याची कारवाई केल्याचे वडाळा आरटीओ अधिकारी बी. आय. अजरी यांनी सांगितले. या प्रकरणी तीन दिवसांत परिवहन आयुक्त यांच्याकडे गडकर दाद मागू शकतात, असेही सांगण्यात आले. (प्रतिनिधी)