शहरं
Join us  
Trending Stories
1
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
2
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
3
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
4
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
5
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
6
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
7
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
8
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
9
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
10
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई
11
मुंबई: ठाकरे गटाच्या पेडणेकर, दुधवडकरांसह आठ जणांची उमेदवारी धोक्यात; प्रभाग आरक्षणाचा फटका
12
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
13
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
14
अंत्यसंस्काराच्या दिवशी कापला केक; चितेवर ठेवण्यापूर्वी वडिलांनी साजरा केला मुलीचा वाढदिवस
15
चातुर्मासाची शेवटची संकष्ट चतुर्थी: गणेश कल्याण करेल, शुभ घडेल; पाहा, व्रत विधी-चंद्रोदय वेळ
16
५ राजयोगात संकष्ट चतुर्थी: १० राशींची इच्छा पूर्ण, मान-सन्मान; यश-कीर्ती-लाभ, शुभ-वरदान काळ!
17
VIRAL : गर्लफ्रेंडच्या हातात हात घालून हॉटेल बाहेर आला; पत्नीने बघताच भर रस्त्यात धुतला! व्हिडीओ व्हायरल
18
मलायकाला झालंय तरी काय? अरबाज खानने लेकीला आणलं घरी, अभिनेत्रीने स्टोरी शेअर करत...
19
India Vs China: भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख विकास इंजिन, चीनची वाढ संथ; पाहा काय म्हणाल्या IMF प्रमुख
20
वर्षाला २० लाखाचं पॅकेज, ५ महिन्यापूर्वी केले लव्ह मॅरेज; २८ वर्षीय युवकानं स्वत:ला का संपवलं?

ग्रंथदिंडीद्वारे जागर वाचनसंस्कृतीचा

By admin | Updated: January 29, 2015 23:41 IST

आठशे विद्यार्थी : घरा-घरांपर्यंत शिक्षणाचा नारा

कोल्हापूर : सामाजिक प्रबोधनाच्या घोषणा, जनजागृती पथनाट्य, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करत विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या ५१ व्या दीक्षान्त समारंभानिमित्त काढलेल्या ग्रंथदिंडीत चैतन्य आणले. थोर पुरुषांच्या वेशभूषेसह विद्यार्थी, फेटे परिधान केलेली मुले-मुली, नऊवारी साडीतील विद्यार्थिनी या ग्रंथदिंडीचे आकर्षण ठरले. आज, गुरुवारी सकाळी आठ वाजता कमला कॉलेज येथे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते ग्रंथदिंडीला प्रारंभ झाला. यावेळी प्र-कुलगुरू अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, बी.सी.यु.डी. संचालक डॉ. अर्जुन राजगे, ग्रंथदिंडीच्या समन्वयक डॉ. नमिता खोत, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, प्राचार्य डॉ. मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या झांजपथकाच्या गजरात ग्रंथदिंडी सुरू झाली. दिंडीत मुलींचा सहभाग लक्षणीय होता. या मुलींनी काही काळ खांद्यावरून ग्रंथदिंडी वाहिली. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या डोक्यावरील गांधी टोप्या हे ग्रंथदिंडीचे आकर्षण होते. दिंडी घरा-घरांपर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा नारा देत मार्गावरून मार्गस्थ होत होती. राजारामपुरी येथील माउली चौकात कॉमर्स व न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ भारत’ विषयावर पथनाट्य सादर केले. त्यानंतर सायबरमार्गे दिंडी विद्यापीठात आली. मुख्य इमारतीत कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके करून दाखविली. विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर, ‘वाचनकट्टा’चे समन्वयक युवराज कदम, कमला महाविद्यालयाचे प्रा. अनिल घस्ते यांच्यासह राजाराम महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज, विवेकानंद कॉलेज, गोखले कॉलेज, के.एम.सी. कॉलेज, न्यू कॉलेज, डी. डी. शिंदे कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सुमारे ८०० विद्यार्थी-विद्यार्थिनी या ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)म्हाळसा, खंडोबा...ग्रंथदिंडीमध्ये कॉमर्स कॉलेजमधील उद्धव बारटक्केने ‘खंडोबा’ची, आकांशा सरनाईकने ‘म्हाळसा’, तर सौरभी मांगलेकरने ‘बानू’ची वेशभूषा केली होती. यासह ‘संत गाडगे महाराज’यांची वेशभूषा विद्यापीठातील कॉमर्स विभागातील सत्यवान करेने, तर ‘समाजशास्त्र’च्या राजेंद्र शेळके यांनी वारकरी वेशभूषा परिधान केली होती हे सर्वजण दिंडीतील आकर्षण ठरत होते.