शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जागर सामाजिक बांधिलकीचा

By admin | Updated: October 8, 2016 01:13 IST

गेल्या ३२ वर्षांपासून भांडुपचे नरदास नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव सेवा मंडळ नवरात्रौत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे.

मुंबई : गेल्या ३२ वर्षांपासून भांडुपचे नरदास नगर सार्वजनिक नवरात्रौत्सव सेवा मंडळ नवरात्रौत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जपताना दिसत आहे. नवरात्रीच्या काळात या ठिकाणी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येते. भांडुप पश्चिमेकडील नरदासनगर परिसरात देवीची आकर्षक मूर्ती बसविण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वांनी एकत्रित येत उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही छोटेखानी उत्सवाची सुरुवात केली. मात्र हळूहळू यात भर पडत भाविकांची रीघ वाढत गेली. याच ठिकाणी विविध स्पर्धात्मक खेळांपासून महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. येथील रात्रीचा ‘फॅन्सी गरबा’ही तितकाच प्रसिद्ध आहे. यामध्ये ९ रंगांची सांगड घालत महिला सहभाग घेतात. (प्रतिनिधी)>सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलनऊ दिवस विविध रंगांच्या साड्यांमध्ये महिला एकरूप झालेल्या पाहावयास मिळतात. तसेच यामध्ये लहानग्यांपासून ज्येष्ठांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळतो. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही या ठिकाणी पाहावयास मिळते. रविवारी सत्यनारायणाच्या महापूजेचे आणि महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्रौत्सवादरम्यान या मंडळातर्फे वैद्यकीय शिबिर, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अवयवदानावर विशेष भरउत्सवानिमित्त या मंडळाकडून अवयवदानाविषयी विशेष जनजागृती केली जाते. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशात जर आपण अवयवदान केल्यास एखाद्याचा जीव वाचविण्यास मदत होईल. त्यामुळे अवयवदान करणे महत्त्वाचे असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.