शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

नाबार्डच्या कर्जातून ५२ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार

By अतुल कुलकर्णी | Updated: August 8, 2019 02:47 IST

मराठवाड्यासाठी ३३८०; विदर्भासाठी ३८४७ तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ७७७१ कोटी मिळणार

- अतुल कुलकर्णी मुंबई : जलसंपदा विभागाच्या ३१३ प्रकल्पांपैकी १० मोठे, १८ मध्यम आणि २२ लघू असे ५२ प्रकल्पांसाठी नाबार्डच्या वतीने १५ हजार कोटींचे कर्ज काढण्यास मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली आहे. या निधीतून मराठवाड्यासाठी ३३८०.८९ कोटी, विदर्भासाठी ३८४७.५९ कोटी तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ७७७१.५२ कोटी मिळतील, अशी माहिती लोकमतशी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.जे ३१३ प्रकल्प आज बांधकामाधिन आहेत त्यावर आजपर्यंत ८३,३०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. (यात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काळातील खर्चही धरलेला आहे) हे सगळे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी ९३,५७० कोटींचा निधी आणखी लागणार आहे. त्यानंतरच राज्यातील २८.७० लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी येत्या तीन वर्षांत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून २६ प्रकल्पांसाठी २२,३९८ कोटी, बळीराजा जलसंजीवनी योजनेतून ९१ प्रकल्पांसाठी १५,३२५ कोटी, मल्टी लॅटरल इनव्हेसमेंट गॅरंटी योजनेतून १० प्रकल्पांसाठी ४२४३ कोटी आणि नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीतून ३० प्रकल्पांसाठी १६४५ कोटी खर्च केले जाणार आहेत. तीन वर्षांत या चार योजनांमधून १५७ प्रकल्पांसाठी ४३,६११ प्रकल्प पूर्ण केले जाणार आहेत.त्याशिवाय ५२ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून १५ हजार कोटी दीर्घ मुदतीचे कर्ज म्हणून घेतले जातील. हा निधी २०१९-२० ते २०२१-२२ या तीन वर्षांत खर्च केला जाईल. या ५२ प्रकल्पांपैकी १६ प्रकल्प विदर्भातील आहेत. तर ७ प्रकल्प मराठवाड्यातील आणि २९ प्रकल्प उर्वरित महाराष्ट्रातील आहेत.या १५ हजार कोटींचे वाटप राज्यपालांच्या निर्देशानुसार केले जात असल्याचे सांगून महाजन म्हणाले, हा प्रस्ताव २०१८-१९ मध्येच सादर करण्यात आला होता. आज निर्णय घेताना जलसंपदा विभागाने नियोजन व वित्त विभागाच्या मदतीने या कर्जासाठी कमीतकमी व्याजदर व मुद्दल परतफेडीसाठी दीर्घ मुदत यांचा विचार करुन वित्तीय संस्था निश्चित केली जाणार आहे. या ५२ प्रकल्पांमुळे तीन वर्षांत ८९१ दलघमी पाणीसाठी निर्माण होईल.