शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

‘प्रायव्हसी’ला मुलभूत हक्क ठरविणे हे कोर्टाचे काम नाही, राज्य सरकारची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:26 IST

भारताची राज्यघटना तयार करताना घटनासभेने साधाक-बाधक चर्चा करून ‘प्रायव्हसी’चा समावेश मुलभूत हक्कांमध्ये केलेला नाही.

नवी दिल्ली : भारताची राज्यघटना तयार करताना घटनासभेने साधाक-बाधक चर्चा करून ‘प्रायव्हसी’चा समावेश मुलभूत हक्कांमध्ये केलेला नाही. बदलत्या परिस्थितीनुसार तशी गरज असेल तर फक्त संसदच घटनादुरुस्ती करून ‘प्रायव्हसी’ला मुलभूत हक्काचा दर्जा देऊ शकते. न्यायालये राज्यघटनेचा अर्थ लावण्याच्या नावाखाली मुळात नसलेला हा मुलभूत अधिकार राज्यघटनेत घालू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात मांडली.‘आधार’मुळे नागरिकांच्या ‘प्रायव्हसी’चा भंग होतो, असे म्हणणा-या याचिकांच्या निमित्ताने सरन्यायाधीश न्या. जगदीश सिंग केहर यांच्या नेतृत्वाखालील नऊ न्यायाधीशांचे घटनापीठ ‘प्रायव्हसी’ मुलभूत अधिकारात येते का यावर सुनावणी करीत आहे. राज्य सरकार या सुनावणीत मुद्दाम सहभागी झाले आहे.महाराष्ट्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील सी. ए. सुंदरम म्हणाले की, राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ मध्ये ‘राईट टू लाईफ अ‍ॅण्ड पर्सनल लिबर्टी’ असे शब्द आहेत. त्यात नुसते ‘लिबर्टी’ किंवा ‘सिव्हिल लिबर्टी’ असे म्हटलेले नाही. त्यामुळे ‘पर्सनल लिबर्टी’ याचा अर्थ फक्त शारीरिक स्वातंत्र्य असाच घ्यायला हवा.हे तुमचे म्हणणे मान्य केले तरी संयुक्त राष्ट्र संघाने स्वीकृत केलेल्या मानवी हक्कांच्या जाहिरनाम्यात ‘प्रायव्हसी’ेचा समावेश आहे व भारतानेही हा जाहिरनामा मान्य केला आहे, त्याचे काय? न्यायालयाने विचारले. त्यावर सुंदरम उत्तरले की, संसदेने ‘प्रायव्हसी’ संबंधी स्वतंत्र कायदा करून या आंतरराष्ट्रीय बंधनाची पूर्तता करता येईल. त्यासाठी ‘प्रायव्हसी’ला मुलभूत अधिकारांमध्ये घालण्याची गरज नाही. राज्यघटनेच्या अनुच्छेद ३०० अन्वये प्रत्येकाला संपत्तीचा आणि ती जपण्याचा अधिकार दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘प्रायव्हसी’चेही रक्षण वैधानिक मार्गाने करता येईलएकीकडे जगण्याच्या मुलभूत हक्काची व्याप्ती उत्तरोत्तर वाढविली जात असताना तुम्ही मात्र तो हक्क संकुचित करू पाहात आहात, असे म्हणून न्यायाधीशांनी सुंदरम यांचे म्हणणे पटत नसल्याचे सूचित केले.

माहितीची गोपनीयता हवी-‘प्रायव्हसी’चा निर्णय प्रकरणागणिक गुणवत्तेवर केला जावा, असे गुजरात सरकारचे म्हणणे होते. मात्र त्यावर न्यायालय म्हणाले की, लोक आपली वैयक्तिक माहिती ठराविक कामासाठी त्रयस्थाला देत असतात. तेव्हा ती माहिती फक्त त्याच कामासाठी वापरली जाणे अपेक्षित असते. भारताची मोठी लोकसंख्या व अशा प्रकारे उघड केल्या जाणाºया व्यक्तिगत माहितीची व्यापकता पाहता उल्लंघनाचा विषय प्रकरणागणिक हाताळणे शक्य होणार नाही. त्यासाठी अशा माहितीची गोपनीयता जपली जाईल यासाठी सर्वंकष असे नियम असणे गरजेचे आहे.