शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

‘संथारा’ची तुलना सती प्रथेशी करणे अयोग्य

By admin | Updated: August 12, 2015 01:34 IST

जैन समाजाच्या संथारा व्रत प्रथेची तुलना सती प्रथेशी करणे अयोग्य असल्याचे आचार्य विजयरत्न सूरीश्वर महाराज यांनी मंगळवारी सांगितले. हे व्रत कोणाच्या दबावाखातर

- अमिताभ श्रीवास्तव,  औरंगाबादजैन समाजाच्या संथारा व्रत प्रथेची तुलना सती प्रथेशी करणे अयोग्य असल्याचे आचार्य विजयरत्न सूरीश्वर महाराज यांनी मंगळवारी सांगितले. हे व्रत कोणाच्या दबावाखातर किंवा दु:खामुळे नाही, तर पूर्ण विचाराअंती व सर्वांच्या सहमतीने अंगीकारले जाते, असे ते म्हणाले. राजस्थान उच्च न्यायालयाने अलीकडेच संथारा व्रताची तुलना सती प्रथेशी करणाऱ्या युक्तिवादावरून या व्रतावर बंदी घातली होती. आचार्य विजयरत्न सूरीश्वर महाराज यांचा मुंबईतील माटुंगा येथे चातुर्मास सुरू असून या दरम्यान लोकमतशी दूरध्वनीवर विशेष संवाद साधताना ते म्हणाले की, आपण न्यायालयाचा निकाल अद्याप वाचलेला नाही; मात्र संथारा व्रत हे दु:खाच्या स्थितीत उचललेले पाऊल नाही, तर शरीर व आत्म्याच्या नूतनीकरणासाठीची साधना आहे. हे व्रत आरंभताना संपूर्ण कुटुंबाची सहमती घेतली जाते. सर्वांच्या सहमतीनेच निर्णय घेतला जातो. यात लाजिरवाणे असे काहीही नाही. संथारा व्रत शरीराला शांत करण्याची प्रक्रिया असून हे व्रत प्रेम आणि उल्हासाने पूर्ण केले जाते. हे व्रत सतीच्या प्रथेप्रमाणे दु:खामुळे किंवा कोणत्याही वयात अंगीकारता येत नाही. मनुष्य पूर्णपणे प्रस्थापित झाल्यानंतर ते अंगीकारले जाते. यात अत्यंत प्रसन्न मनाने ईहलोकीचा त्याग केला जातो. तंदुरुस्त शरीर असलेल्यांना संथारा व्रत अंगीकारण्यास मनाई आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणारमुंबई : हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ‘आॅल इंडिया जैन मायनॉरिटी सेल’च्या कायदा विभागाची मुंबईत बैठक झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा उहापोह करत निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय झाला.संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले की, संथारा व सल्लेखना या परंपरा आत्महत्येशी जोडणे हे संपूर्णत: तर्क विसंगत आहे. या दोन्ही परंपरांमध्ये आहारासह सर्व सुख-सुविधांचा त्याग केला जातो. त्यागाचे सर्वोत्तम उदाहरण असलेली ही परंपरा जैन समाजातील एक महत्त्वपूर्ण परंपरा आहे. त्यावर केलेला आघात सहन केला जाणार नाही. याविषयी पुढील कार्यवाही तत्काळ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.