शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने वारंवार घर सोडून जाणे ही क्रूरताच

By admin | Updated: January 15, 2017 21:03 IST

पत्नीने कुणालाही न सांगता सासरचे घर वारंवार सोडून जाणे व अनेक दिवसांपर्यंत बाहेर राहणे ही कृती क्रूरतेच्या

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 15 - पत्नीने कुणालाही न सांगता सासरचे घर वारंवार सोडून जाणे व अनेक दिवसांपर्यंत बाहेर राहणे ही कृती क्रूरतेच्या व्याख्येत मोडणारी आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात देऊन पतीला घटस्फोट मंजूर केला आहे. प्रकरणातील पती निखिल व पत्नी भावना हे नागपूर येथील रहिवासी आहेत (दोन्ही नावे काल्पनिक). भावनाला सासरचे घर वारंवार सोडून जाण्याची सवय होती. घर सोडून जाताना ती कुणालाही सांगत नव्हती. ती अनेक दिवस बाहेर राहिल्यानंतर घरी परत येत होती. ती निखिल व सासूसोबत सन्मानाने वागत नव्हती. घरची कामे करीत नव्हती. तिने निखिलचा विरोध असतानाही बँकेतून कर्ज घेऊन व स्वत:चे दागिने विकून ब्युटी पार्लर व मसाज सेंटर सुरू केले होते. तसेच, निखिल व त्याच्या जालना येथील भावाविरुद्ध ते हुंड्यासाठी छळ करीत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली होती. पाणी डोक्यावररून गेल्यानंतर निखिलने भावनाच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी सुरुवातीला कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने ३१ आॅगस्ट २०१० रोजी याचिका खारीज केली होती. या निर्णयाविरुद्ध निखिलने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी वरीलप्रमाणे निर्णय देऊन निखिलचे अपील मंजूर केले व कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला. निखिल व भावनाचे ७ मार्च १९९४ रोजी लग्न झाले होते. काही वर्षे दोघेही आनंदात राहिले. त्यानंतर भावनाने वाईट वागायला सुरुवात केली असे निखिलचे म्हणणे होते.