शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा येणार ऐरणीवर

By admin | Updated: November 12, 2015 03:10 IST

उत्तर नगर जिल्ह्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी पुढे येत असून, दिवाळीनंतर शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत़ मुळा धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक आहे़

अहमदनगर : उत्तर नगर जिल्ह्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी पुढे येत असून, दिवाळीनंतर शेतीच्या आवर्तनाचा मुद्दा चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत़ मुळा धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक आहे़ पण, भंडारदरा धरणातून शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नसल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे़मुळा व भंडारदरा धरण उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरले आहे़ या दोन्ही धरणांमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील शेती फुलली,़ मात्र समन्यायी पाणीवाटप कायद्याने पाणी जायकवाडीला सोडण्यात आले़ प्राधिकरणाच्या या निर्णयाविरोधात उत्तरेतील साखर कारखाने व लोकप्रतिनिधींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली़ न्यायालयाने याचिका फेटाळत मुळा व भंडादरातून आठ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय कायम ठेवला़ त्यानुसार मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास प्रारंभ झाला़ मराठवाड्याला पाणी सोडण्यास उत्तर नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून विरोध झाला नाही़ मात्र जायकवाडीला सोडले तसे नगर जिल्ह्यातील शेतीला पाणी द्या, अशी आग्रही मागणी उत्तर नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे़ जायकवाडीला १ हजार ८४४ दशलक्ष घनफुट पाणी सोडल्यानंतर मुळा धरणात ८ हजार ३४२ दशलक्ष घनफुट पाणी असेल़ उपलब्ध पाणीसाठ्यातून बाष्पीभावन, पिण्याचे पाणी, टँकर, एमआयडीसी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाला पाणी देऊन २ हजार ७९३ दशलक्ष घनफुट पाणीसाठा शेतीसाठी शिल्लक राहणार आहे़ शेतीसाठी एक आवर्तन सोडायचे झाल्यास ५ हजार ५०० दशलक्ष घनफुट पाणी आवश्यक आहे़ तुलनेत पाणीसाठा कमी असेल़ त्यामुळे ५० टक्के पाणी शेतीला देण्याच्या निर्णयापर्यंत प्रशासन आले़ परंतु त्यास वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे़ भंडारदरातून जायकवाडीसाठी ६़५० टीएमसी पाणी सोडण्यात येईल़ या धरणात एकूण ११ हजार ५२९ दशलक्ष घनफुट पाणीसाठा उपलब्ध होता़ त्यातून जायकवाडीला ६ हजार ५०० दशलक्ष घनफुट पाणी सोडण्यात आले़ परिणामी भंडारदरा धरणात ४ हजार ८३० दशलक्ष घनफूट पाणीसाठा असेल़ या पाणीसाठ्यातून बाष्पीभवन, टँकर, औद्योगिक वसाहतींसाठी एकूण ४ हजार ६३६ दशलक्ष घनफुट पाणी आरक्षित आहे़ आरक्षण वगळल्यास धरणात शेतीसाठी पाणी शिल्लक राहत नसल्याने उन्हाळ्यात भीषण स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)