शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इस्त्रायल शेती तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञांचा पुन्हा भर!

By admin | Updated: September 3, 2014 01:28 IST

डॉ. पंदेकृवितील सूक्ष्म सिंचन शेतीचे शेतकर्‍यांनी केले अनुकरण

अकोला : विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील इस्त्रायल शेतीचा प्रयोग पुढे नेण्यासाठी या विद्यापीठाला अपयश आले असले तरी, विदर्भातील अनेक शेतकर्‍यांनी इस्त्रायल सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान अवगत केले आहे. त्याअनुषंगाने कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी इस्त्रायल शेतीचे तंत्रज्ञान अवगत करण्यावर पुन्हा भर दिला आहे.माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात कृषी विद्यापीठात दोनशे हेक्टरवर उच्च घनता कापूस लागवड करण्यात आली होती. यासाठी या दोनशे हेक्टरवर इस्त्रायल तंत्रज्ञानाचा अर्थात सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्यात आला होता. तसेच विद्यापीठाच्या कापूस संशोधन क्षेत्रावर प्रयोगशाळाही उभारण्यात आली होती. संगणक प्रणालीद्वारे या शेतीला लागणार्‍या पाण्याचे नियोजन करण्यात येत होते. खते व इतर रासायनिक औषधांची फवारणीसुद्धा याच तंत्रज्ञानाद्वारे केली जात होती. इस्त्रायलचे शास्त्रज्ञ या सर्व प्रणालीची देखरेख करीत असल्याने, या विद्यापीठातील शास्त्रज्ञांना या उच्च घनता कापूस लागवडीचा फायदा तर झालाच, शिवाय या तंत्रज्ञानामुळे कापसाचे उत्पादन हेक्टरी ३५ ते ४0 क्विंटलपर्यंत पोहोचले होते. दरम्यान, आधुनिक शेतीचे हे तंत्रज्ञान येथील सामान्य शेतकर्‍यांना परवडणारे नसल्याची आवई त्यावेळी उठविण्यात आली आणि कोट्यवधी रुपये खर्चून कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर उभारण्यात आलेल्या या तंत्रज्ञानाचा बट्टय़ाबोळ झाला. आजही विद्यापिठात या तंत्रज्ञानाचे भग्न अवशेष पडून आहेत; परंतु आता येथील शास्त्रज्ञांचा या शेतीकडे कल पुन्हा वाढला असून, या तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ह्यइस्त्रायल शेती तंत्रज्ञान व भारतीय शेतीची वर्तमानातून दुसर्‍या हरितक्रांतीकडे वाटचालह्ण या विषयावर परिसंवाद ठेवून कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचे प्रबोधनही करण्यात आले. बॉक्स*केवळ ३0 मिमी पावसात शेतकरी समृद्ध राज्यात आतापर्यंत सिंचन विकासावर ७0 हजार कोटी खर्च झाले; तथापि सिंचनाची आकडेवारी पुढे सरकली नाही. दक्षिण इस्त्रायल प्रांतात केवळ ३0 मिमी पाऊस पडतो; परंतु येथील शेतकरी समृद्ध आहे. म्हणूनच इस्त्रालय तंत्रज्ञानाकडे येथील शास्त्रज्ञांचा कल पुन्हा वाढत आहे.बॉक्स*इस्त्रायल शेतीचे अनुकरणकृषी विद्यापीठातील या सूक्ष्म सिंचन शेतीचे प्रात्यक्षिक बघून त्यावेळी विदर्भातील अनेक शेतकर्‍यांनी ठिबक सिंचन शेती केली आहे. त्याचे फायदे आजही अनेक शेतकरी घेत आहेत.*इस्त्रायल शेतीमुळे खरोखरच कापसाचे हेक्टरी उत्पादन ४0 क्विंटलपर्यंत पोहोचले होते; परंतु आपल्याकडील गरीब शेतकर्‍यांना हे तंत्रज्ञान परवडणारे नसल्याने, त्याकडे कानाडोळा करण्यात आला. असे असले तरी, अनेक शेतकर्‍यांनी या तंत्रज्ञानाद्वारे उत्तम ठिबक सिंचन सुरू केलेले आहे.- डॉ. शरदराव निंबाळकर,माजी कुलगुरू डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअकोला.