शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

आयआरबीकडून नुकसानभरपाई घेणार

By admin | Updated: July 21, 2015 01:22 IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने दिलेली नुकसानभरपाई या महामार्गाचे कंत्राटदार आयआरबी

मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दरड कोसळून झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने दिलेली नुकसानभरपाई या महामार्गाचे कंत्राटदार आयआरबी यांनी दिली पाहिजे, असे निर्देश विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सोमवारी दिले.संजय दत्त व अन्य सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवरील अपघाताबाबत स्थगन प्रस्ताव दाखल केला आहे. दरड कोसळण्याच्या घटना वरचेवर घडू लागल्याने वरदान ठरलेला हा महामार्ग दुर्घटनेचा सापळा झाला असून, कंत्राटदार कंपनीवर दरड कोसळून झालेल्या मृत्यूकरिता हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दत्त यांनी केली. त्याचबरोबर अपघातानंतर उपचाराकरिता लोणावळा येथे सुपरस्पेशालिटी इस्पितळ उभारण्याची मागणी त्यांनी केली.सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारच्या दुर्घटनेबाबत निवेदन केले. ते म्हणाले की, एक्स्प्रेस-वेवरील दुर्घटनेत दोन जण मरण पावले तर सहा जण जखमी झाले. मृतांच्या नातलगांना प्रत्येकी ४ लाख रुपये भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने केला आहे. भविष्यात दुर्घटना टाळण्याकरिता दोन कंपन्यांनी सादरीकरण केले असून, पुण्यातील जिआॅलॉजिस्ट यांच्याबरोबर चर्चा केली आहे. शेकापचे जयंत पाटील म्हणाले की, दुर्घटनेस कंत्राटदारांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने मृतांच्या नातलगांना राज्य सरकारने नव्हेतर, आयआरबी कंपनीने पैसे दिले पाहिजेत. सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले की, मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याने आयआरबीने नुकसानभरपाईची रक्कम देण्याची व्यवस्था करावी. (विशेष प्रतिनिधी)