शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आय्यो! घरफोडीच्या चौघांच्या टोळीत तीन महिला़ !

By admin | Updated: August 22, 2016 19:37 IST

शहरातील शाहुपुरी कॉलनीत रविवारी सकाळी घरफोडी झाली होती. या घटनेत २ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता

ऐकावे ते नवलच : चोरट्यांकडून १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त...ऑनलाइन लोकमतलातूर, दि. २२ : शहरातील शाहुपुरी कॉलनीत रविवारी सकाळी घरफोडी झाली होती. या घटनेत २ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत २४ तासांत तीन महिला चोरट्यांसह एका पुरुषाला सोमवारी सकाळी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, इतर चोरीच्या घटनांतही त्यांचा समावेश आहे का? याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. विशेष म्हणजे मोठ्या घरफोडीच्या घटनेत महिलांचा सहभाग असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे़

राजीव गांधी चौक परिसरातील शाहुपुरी कॉलनीत अमोल माणिकराव पाटील (३३) हे आपल्या बेलकुंड येथे गावी अंत्यसंस्कारासाठी घराला टाळे लावून गेले होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता बंद असलेल्या घरावर नजर ठेवून आरोपी सुचिता अर्जुन काळे (३५), मंगल किशोर सोनवणे (३५), सुनिता बन्सी काळे (४०) आणि प्रकाश उर्फ बांग्या सोपान काळे (३५ सर्व रा. नांदेड रोड लातूर) या चोरट्यांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले रोख २२०० रुपये व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ४५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या प्रकरणी बेलकुंडहून आलेल्या अमोल  पाटील यांना आपले घर फोडल्याची निदर्शनास आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील चोरट्यांना पकडण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. शहरातील विविध पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवर अलेल्या तीन महिला आणि एका पुरुषाला संशयित म्हणून ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला. यावेळी आपण हे घर फोडल्याचे चोरट्यांनी कबूल केले. सोमवारी दुपारी चौघांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २५ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.  

चौघांवर विविध ठाण्यात गुन्हे...शाहुपुरी कॉलनीतील घरफोडीत सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी तिघा महिलांसह एका पुरुषाला उचलले असून, त्यांच्याकडून निम्मा मुद्देमालही हस्तगत केला आहे. या तिन महिलांवर शहरातील शिवाजीनगर, गांधीचौक, एमआयडीसी, लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीसारखे प्रत्येकांवर चार ते पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. पहाटेच्यावेळी घरफोडी करण्याची पध्दत या टोळीची खासियत आहे. प्रकाश उर्फ बांग्या सोपान काळे हा अट्टल गुन्हेगार आहे. हाच या टोळीचा म्होरक्या असून, महिलांचा घरफोडीत तो वापर करतो. त्याच्यावरही ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण यांनी दिली.