शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

विविध राष्ट्रप्रमुखांना निमंत्रणे

By admin | Updated: October 4, 2016 01:48 IST

भाषा, प्रांत, देश याचे ‘सीमोल्लंघन’ करून सातासमुद्रापार असलेल्या तेरा देशांंमधील पंजाबी बांधवांना आर्त साद घालत, पुण्यात होणाऱ्या विश्व पंजाबी साहित्य

पुणे : भाषा, प्रांत, देश याचे ‘सीमोल्लंघन’ करून सातासमुद्रापार असलेल्या तेरा देशांंमधील पंजाबी बांधवांना आर्त साद घालत, पुण्यात होणाऱ्या विश्व पंजाबी साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पंजाबी-मराठी मनोमिलनाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्या-त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह राजदूतांनाही पत्रे पाठविण्यात आली असून, अमेरिका, ब्रिटन, अफगाणिस्तान आदी विविध देशांच्या प्रतिनिधींनीही येण्याचे मान्य केले आहे. घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये एक सांस्कृतिक बंध निर्माण झाला. पुणे हे सांस्कृतिक शहर असल्याने या साहित्य समृद्धतेने नटलेल्या भूमीमध्ये पंजाबी अभिजनांच्या मांदियाळीत विश्व पंजाबी साहित्य संमेलनाचा सोहळा रंगणार आहे. सरहद संस्थेतर्फे गुरू गोविंदसिंग यांच्या ३५० व्या जयंतीचे औचित्य साधून दि. १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान हे संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या कक्षा रुंदावत संंमेलनाला वैश्विक रूप देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे, असे सांगून सरहदचे संजय नहार म्हणाले, की या संमेलनाला केवळ देशभरातीलच नव्हे, तर पाकिस्तान सोडून १३ देशांमधील पंजाबी बांधवांना संमेलनाला येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय त्या-त्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह राजदूतांनाही पत्रे पाठविण्यात आली आहेत. राष्ट्रप्रमुखांनी संमेलनासाठी संदेश पाठवावा आणि राजदूतांनी संमेलनास यावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. संमेलनासाठी कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, अफगाणिस्तान, इराण आदी देशांंमधील प्रतिनिधींंनी येण्याचे मान्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.