शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये कोस्मो फिल्म कंपनीची गुंतवणूक

By admin | Updated: July 29, 2016 01:52 IST

कोस्मो फिल्मस् लिमिटेड या कंपनीने औरंगाबाद येथील वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास दिला आहे.

मुंबई : कोस्मो फिल्मस् लिमिटेड या कंपनीने औरंगाबाद येथील वाळुज औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव राज्य शासनास दिला आहे. या नव्या प्रकल्पामुळे पाचशे जणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.कोस्मो फिल्मस् कंपनीचे गुजरात आणि वाळुज येथे प्रकल्प आहेत. याव्यतिरिक्त कंपनीने आणखी ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून वाळुज औद्योगिक वसाहतीत नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या माध्यमातून औरंगाबाद परिसरातील शेंद्रा व बिडकीन येथे औद्योगिक वसाहत निर्माण होत आहे. या सर्व विकास कामामुळे आणि राज्याने स्वीकारलेल्या उद्योगस्नेही धोरणामुळे विविध कंपन्या औरंगाबाद परिसरात उद्योग उभारण्यासाठी इच्छुक आहेत. कोस्मो फिल्मस् कंपनीचे वाळूंज औद्योगिक वसाहतीमध्ये यापूर्वीच उत्पादन सुरू असून आता नव्याने उभारण्यात येणाऱ्या नव्या प्रकल्पामधून पाचशे जणांना रोजगार मिळणार आहे, अशी माहिती उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)