शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील निवडणुकांची ‘एसटी’वर स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2017 03:44 IST

राज्यात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांच्या कामांसाठी एसटी महामंडळाने साथ देण्याचा निर्णय

सुशांत मोरे / मुंबई राज्यात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांच्या कामांसाठी एसटी महामंडळाने साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून राज्यातील निवडणुकांसाठी यंदा ५,१00 एसटी बसेस आरक्षित केल्या आहेत. १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत या एसटी आरक्षित असतील, अशी माहिती देण्यात आली. कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याबरोबरच निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिन, त्याचबरोबर अन्य कामांसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची गरज भासते. त्यामुळे खासगी वाहने आरक्षित केली जातात, परंतु ही वाहने महागात पडत असल्याने, सार्वजनिक वाहने आरक्षित करण्यावर भर दिला जातो. या वेळी राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असून, त्यामुळे निवडणूक कामांसाठी वाहनांची मोठी गरज भासणार आहे. हे पाहता, एसटी महामंडळाच्या बसेस मदतीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास ५,१00 बसेस निवडणूक कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद विभागात (औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड,उस्मानाबाद, लातूर, जालना)१,0१४ बस, नाशिक विभागासाठी (नाशिक, जळगाव, अहमदनगर) ८६0, मुंबई विभागासाठी (मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग) ७४३, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली) ३0१ बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.आरक्षित बसची तारीख15 आणि 16 फेब्रुवारी - बीड, परभणी, औरंगाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा.20 आणि 21 फेब्रुवारी - नाशिक, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, अमरावती.