शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह केल्याने निर्घृण खून

By admin | Updated: July 22, 2016 00:45 IST

भाचीने आंतरजातीय विवाह केला याचा राग धरून कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे मामाच्या मुलाने ७ साथीदारांसमवेत तरुणाचा गळा कापून व गोळ्या घालून निर्घृण खून केला.

लोणी काळभोर : भाचीने आंतरजातीय विवाह केला याचा राग धरून कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे मामाच्या मुलाने ७ साथीदारांसमवेत तरुणाचा गळा कापून व गोळ्या घालून निर्घृण खून केला. ही घटना काल मध्यरात्री उघडकीस आली.नागेश ऊर्फ दादा अशोक लोंढे (वय ३२) यांचा खून झाला. त्यांची पत्नी प्रियांका यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी संजय मोरे (वय ४६), अजिंक्य मोरे ( वय २०, दोघेही रा. प्रयागधाम), दीपक घटमाळे (वय २२), निखिल मदगडे ( वय २३) व महेश मदगडे (२०, तिघेही रा. कोरेगाव मूळ) यांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये प्रियांका व नागेश यांनी आंतरजातीय विवाह केला होता. तेव्हापासूनच प्रियांकाचे मामा संजय मोरे व त्यांचा मुलगा मच्छिंद्र हे तिच्यावर व तिच्या आईवर चिडून होते. २० जुलै रोजी मध्यरात्रीपर्यंत नागेश घरी न आल्याने प्रियांकाने फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा भाऊ अक्षयसह शोध घेण्यास निघाले. नागेश यांचा खून झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)मुलीवर प्राणघातक हल्ला घोडेगाव : एकतर्फी प्रेमातून कोटमदरा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या मुलीवर एका अल्पवयीन तरुणाने ब्लेडने गळ्यावर मारुन प्राणघातक हल्ला केला. मुलीच्या गळ्याला आठ टाके पडले असून या हल्ल्यात ती बचावली. मुलगी प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने हल्ला केल्याचे तपासात पुढे आले आहे. आरोपी मुलीच्या घराशेजारीच राहत होता. मुलगी त्यांच्या किरणा दुकानात बसली असताना आरोपीने दाराची कडी वाजवली, दार उघडल्याबरोबर तिच्या गळ्यावर ब्लेडने हल्ला केला.