शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बिनचूक निकालासाठी आता ‘इंटर्नल मार्क्स एंट्री’ सॉफ्टवेअर

By admin | Updated: October 22, 2014 00:23 IST

शिवाजी विद्यापीठ : संगणक केंद्राचा उपक्रम, सर्व विभागांत वापर होणार

कोल्हापूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक व तत्सम अंतर्गत गुण देण्याची प्रक्रिया अधिक काटेकोर व पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या संगणक केंद्राने इंटर्नल मार्क्स (अंतर्गत गुण) एंट्री सॉफ्टवेअर विकसित केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये व विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील, तर पुढील टप्प्याटप्प्यांत सर्व परीक्षांच्या निकालासाठी या सॉफ्टवेअरचा वापर केला जाणार आहे.विद्यापीठाच्या संगणक केंद्राने ‘इंटर्नल मार्क्स एंट्री’ या सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. सर्व माहिती भरल्याची खातरजमा झाल्यानंतर अंतिम माहितीची खात्री करण्याची जबाबदारी प्राचार्यांवर राहणार आहे. त्यामुळे यंत्रणेतील प्रत्येक टप्प्यावर गुण भरल्याची पडताळणी होईल. महत्त्वाचे म्हणजे आॅनलाइन गुण भरण्याच्या या प्रक्रियेला विशिष्ट कालमर्यादा घालून दिली जाईल. निश्चित केलेल्या दिवशी ही लिंक आपोआपच बंद होणार असल्याचे विद्यापीठाच्या संगणक केंद्र संचालक स्वाती खराडे यांनी सांगितले. दरम्यान, या सॉफ्टवेअरची माहिती देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी मार्गदर्शन केले. अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एम. सावंत, डॉ. के. रवी, दीपक मधुकर, एस. आर. पावसकर, एम. जी. देवमाने, पी. एस. पाटील, अभियांत्रिकी अभ्यास मंडळ सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, रजिस्ट्रार व कर्मचारी उपस्थित होते. उपकुलसचिव डॉ. पी. एस. पांडव यांनी प्रास्ताविक केले. बी. ए. किणीकर यांनी आभार मानले. असे आहे सॉफ्टवेअरविद्यापीठाकडे विद्यार्थ्यांची परीक्षापूर्व माहिती (डाटा) उपलब्ध असते. ती ज्या-त्या महाविद्यालयाला संगणक केंद्रामार्फत इंटरनेटद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल. या सर्व माहितीचे नियंत्रण व व्यवस्थापन संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे सोपविण्यात येणार आहे. प्राचार्यांना या सॉफ्टवेअरवरून स्वतंत्र लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला जाईल. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विषयाच्या अधिविभागप्रमुखांवर त्यांच्या विद्यार्थ्यांची जबाबदारी सोपविण्यात येईल. अधिविभाग प्रमुखांमार्फत अंतर्गत परीक्षांसाठी परीक्षक नियुक्त करण्यात येत असतात. त्या परीक्षकांकडून प्रात्यक्षिक, अंतर्गत परीक्षांचे गुण ज्या-त्या विद्यार्थ्याच्या आॅनलाइन प्रोफाइलमध्ये भरणे आवश्यक असेल. सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची माहिती भरल्याखेरीज हे निकालपत्रक सिस्टीमकडून सबमिट करवून घेतले जाणार नाही.