शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला २२ कोटी जमा करण्याचे निर्देश

By admin | Updated: April 23, 2015 05:24 IST

राज्य शासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची सुमारे ४४ कोटी रुपयांची वसुली रखडली आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

नागपूर : राज्य शासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची सुमारे ४४ कोटी रुपयांची वसुली रखडली आहे. यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाला २२ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. ही रक्कम न्यायालयाच्या प्रबंधक कार्यालयात जमा करायची आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राज्य शासनाच्या हमीवर दर्यापूर येथील संत गाडगेबाबा सुत गिरणीला २१ कोटी रुपयांवर कर्ज दिले होते. सुत गिरणीला कर्जाची परतफेड करता आली नाही. २००४ मधील न्यायालयीन निर्णयानुसार बँकेला २१ कोटी ८६ लाख ५९ हजार ११७ रुपये वसूल करायचे आहेत. १४ टक्के व्याज आकारल्यास ही रक्कम ४४ कोटी रुपयांच्या जवळ जाते. बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यान्वये सूत गिरणीची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. विशेष वसुली अधिकारी अविनाश सिंगम यांनी मालमत्तेचा ताबा घेतला आहे. आता मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी शासनाने किमान किंमत निश्चित करणे आवश्यक आहे. परंतु, यासंदर्भात शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. परिणामी मालमत्तेचा लिलाव रखडला आहे. त्याविरुद्ध बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक व विशेष वसुली अधिकारी यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)