शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षकाला अटक

By admin | Updated: October 16, 2015 03:55 IST

अनियमितताप्रकरणी कारवाई न करण्यासाठी वाईन शॉप मालकाकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय भरारी

औरंगाबाद : अनियमितताप्रकरणी कारवाई न करण्यासाठी वाईन शॉप मालकाकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्यस्तरीय भरारी पथकाचा निरीक्षक सुभाष जाधव (रा. मुंबई) याला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून गुरुवारी रंगेहाथ पकडले.पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘राज्यस्तरीय भरारी पथक बुधवारपासून औरंगाबादेत आहे. पथकाला कोणत्याही वाईन शॉपचे रेकॉर्ड तपासण्याचे आणि अनियमिततेबद्दल कारवाईचे अधिकार आहेत. जाधव या पथकाचा प्रमुख आहे.’या पथकाने शहरातील काही वॉईन शॉप तपासले. त्यानंतर त्यांनी गारखेड्यातील सूतगिरणी चौकात असलेल्या एका वाईन शॉपचे मालक हितेश मकवाणी यांना बोलावून घेतले. हितेश यांच्या मालकीची आणखी दोन वाईन शॉप आहेत. नोकरांची माहिती प्रशासनास दिली नाही, मद्याचा साठा, खरेदी-विक्रीचे रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले नसल्याचे दाखवून, जाधवने दुकानावर कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १ लाख २० हजार रुपये ठरले. हितेश यांनी या संदर्भात एसीबीकडे तक्रार दाखल केली. दुपारी एकच्या सुमारास तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना जाधव याला रंगेहात पकडले.