शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

संशयित बोटींची भर समुद्रात तपासणी

By admin | Updated: December 6, 2015 01:59 IST

मुरुडमधील समुद्रात २८ नोव्हेंबर रोजी कासा किल्ल्यापासून सुमारे मैलाच्या अंतरावर रायगड पोलिसांच्या सागर गस्त बोटीला दोन संशयास्पद बोटी निदर्शनात आल्या होत्या.

अलिबाग : मुरुडमधील समुद्रात २८ नोव्हेंबर रोजी कासा किल्ल्यापासून सुमारे मैलाच्या अंतरावर रायगड पोलिसांच्या सागर गस्त बोटीला दोन संशयास्पद बोटी निदर्शनात आल्या होत्या. त्यातील एक बोट जवान-८ ही सी गोइंग टग व जवान-८ ही प्रवासी बोट असल्याचे निष्पन्न झाले. या बोटी मलेशियामधील पेनाँग या ठिकाणाहून दुबई येथे जात होत्या. जवान-८ या टगच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पहाटे २ वाजण्याच्या दरम्यान बोटी नांगर करण्याकरिता कासा किल्ल्याजवळ आणल्याचे या परदेशी बोटींवरील खलाशांनी पोलिसांना सांगितले.बोटीवर ९ इराणी, ३ भारतीय खलाशीबोटीवर एकूण १२ खलाशी असून, त्यापैकी ९ खलाशी इराणी पासपोर्ट असलेले, तर ३ खलाशी भारतीय पासपोर्टधारक असल्याचे तपासणीत दिसून आले. बोटींची व खलाशांची कसून तपासणी केल्यावर या दोन्ही बोटींची रायगड बॉम्ब व स्फोटक तपासणी पथक व श्वान पथकाकडूनही तपासणी करण्यात आली. त्यात काहीही आक्षेपार्ह मिळून आले नाही.डिझेल उपलब्ध झाल्यावर बोटी दुबईकडे रवानाबोटीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर २९ नोव्हेंबर रोजी सकाळी तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी या बोटचालकांना भारतीय हद्दीतून बाहेर जाण्यास सूचना दिली आहे. मात्र परदेशी बोटीचे डिझेल संपल्याने रेवदंडा बंदरात त्या दोन मैलांवर येऊन उभ्या होत्या. त्यांच्या कंपनीने मुंबईहून डिझेलसाठा पाठविलेला आहे.शनिवारी या बोटींना डिझेल उपलब्ध झाल्यावर दोन्ही बोटींची पुन्हा सर्व प्रकारे तपासणी केल्यानंतर शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास या दोन्ही बोटी दुबईकडे मार्गस्थ झाल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस मो. सुवेझ हक यांनी दिली आहे.