शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

उपायुक्तांमार्फत होणार चौकशी

By admin | Updated: September 10, 2016 02:03 IST

कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश

जितेंद्र कालेकर,

ठाणे- कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांना बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणाची पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिले असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. तसेच याबाबतचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाणार असून यातील आरोपींची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही, असे सिंग यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांमध्ये ठाणे आणि कल्याण या भागांत पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्याला बुडवून ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पार्श्वभूमीवर सिंग यांच्याशी बातचीत केली, त्यावेळी त्यांनी वरील शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. वाढत्या हल्ल्यांसंदर्भात पोलीस आता आपली काय भूमिका घेणार आहेत, असे विचारले असता ते म्हणाले की, पोलिसांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. हल्ले करणारी व्यक्ती कोणीही असो, तिच्यावर कारवाई केली जाईल. यापुढे असे हल्ले झाले तर भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३ अन्वये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांनी राज्य शासनाला सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हल्लेखोरांना जास्तीतजास्त शिक्षा होणार आहे, परिणामी त्यांच्यावर जरब बसेल, असा दावाही त्यांनी केला.कल्याण प्रकरणात राजकीय दबाव येत असल्याचाही त्यांनी इन्कार केला. असा दबाव आला असता तर कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न करणे) या कलमाखाली गुन्हा दाखल झाला नसता आणि आरोपींना थेट १५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली नसती. आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. उलटपक्षी या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली असून थेट पोलीस उपायुक्तांमार्फतच या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिल्याचेही ते म्हणाले. >जनमानसातील पोलिसांची प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्नजनमानसातील पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी पोलिसांमध्ये नेहमीच वेगवेगळे उपक्रम, रिफ्रेशमेंट कोर्स, पोलीस रायझिंग डे निमित्त विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम घेतले जातात. याशिवाय, पोलिसांच्या कार्यप्रणालीची ओळख करून दिली जाते. तसेच गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढवणे, फिर्यादीला सौजन्याची वागणूक द्यावी, यासाठीही प्रत्येक गुन्हे आढावा बैठकीत सूचना करण्यात येत असतात. ही प्रक्रिया हल्ले झाल्यानंतर नाही तर यापूर्वीपासूनच सुरू असल्याचेही ते म्हणाले. ज्या अधिकाऱ्यावर हल्ला झाला, त्याने जरीमरी मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ढोल फाडला तसेच त्यांनी बुटासहित मूर्तीचे विसर्जन केल्याच्या आरोपाचाही पोलीस आयुक्तांनी इन्कार केला. हा आरोप खोटा आहे. गरज पडल्यास कोणीही यासंदर्भात व्हायरल झालेली क्लिपिंग पाहावी, असेही ते म्हणाले. >नागरिकांमधील नैराश्याचा अभ्यास करणारहल्ल्यांमागे नागरिकांमधील पोलिसांवरचा रोष, लाचखोरी किंवा फिर्यादीला पोलीस ठाण्यात सौजन्याची वागणूक न मिळणे अशीही काही कारणे असल्याकडे सिंग यांचे लक्ष वेधले असता त्यांनी त्याचा साफ इन्कार केला. ठाण्यात नितीन कंपनीजवळ एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याने वाहतुकीचे नियम तोडले होते. त्यामुळे तिने कारवाईसाठी त्याला थांबण्याचा इशारा केल्यानंतर त्याने तिला मारहाण करीत तिचा विनयभंग केला. यात लाचखोरी किंवा फिर्यादीला सौजन्यपूर्ण वागणूक न देण्याचा कुठेही प्रश्नच येत नाही. जेथे पोलिसांवर हल्ले झाले, तिथे ते वैयक्तिक कारणातून झाले आहेत. नागरिकांमधील वाढते नैराश्य किंवा इतर कोणती कारणे यामागे आहेत, याचा मात्र बारकाईने अभ्यास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.असा रोष असता तर पोलिसांच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोर्चे काढले नसते. मुंब्रा, कल्याण आणि ठाण्यातही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोर्चे काढले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.