शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्यात मनाई आदेश जारी

By admin | Updated: November 3, 2016 02:50 IST

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून १६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून १६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात माथेरान, खोपोली, पेण, अलिबाग, मुरु ड, रोहा, श्रीवर्धन, महाड या नगरपरिषदेच्या निवडणुका २७ नोव्हेंबर २०१६ रोजी होणार असून या निवडणुकीकरिता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखली जावी यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या विविध कलमान्वये हा मनाई आदेश जारी केला आहे.या आदेशानुसार शस्त्रे, काठ्या किंवा लाठ्या अगर शारीरिक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे, अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे किंवा बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, चित्रे, चिन्हे अगर कोणतीही तत्सम वस्तू, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे ही कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.