शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

इंजेक्शन योग्यच

By admin | Updated: September 13, 2014 04:44 IST

कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा रुग्णालयामध्ये १८ आॅगस्टला रात्री महिला वॉर्डातील ३२ महिलांना तापाच्या इंजेक्शनची अ‍ॅलर्जी झाली होती

मुंबई : कुर्ला येथील महापालिकेच्या भाभा रुग्णालयामध्ये १८ आॅगस्टला रात्री महिला वॉर्डातील ३२ महिलांना तापाच्या इंजेक्शनची अ‍ॅलर्जी झाली होती. इंजेक्शन सदोष असू शकतील, असा प्राथमिक अंदाज वर्तवला गेला होता, मात्र अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीअंती प्रतिजैविकांमध्ये कोणताही दोष नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.भाभा रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये ताप आलेल्या रुग्णांना १८ आॅगस्ट रोजी साडेआठच्या सुमारास सेफोटॅक्झिम आणि सेफ्ट्रीअ‍ॅक्झोन प्रतिजैविके देण्यात आली होती. तासाभरानंतर ३२ महिलांना थंडी, उलट्यांचा त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना सायन आणि केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यातील सायरा शेख (४७) या महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकारानंतर तत्काळ या बॅचमधील प्रतिजैविकांचा वापर बंद करण्यात आला होता. या बॅचमधील प्रतिजैविके आधीही वापरली जात होती. मात्र त्या वेळी कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी कोणत्याही रुग्णाला झाली नव्हती. मात्र याच दिवशी असे का झाले, हे शोधण्यासाठी या प्रतिजैविकांचे नमुने प्रशासनाने घेतले होते. तीन तपासण्या झाल्यावर या प्रतिजैविकांमध्ये कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अहवाल गुरुवारी प्रशासनाने महापालिकेकडे दिलेला आहे, अशी माहिती प्रशासनाचे सहआयुक्त (औषध) एस.टी. पाटील यांनी दिली.प्रतिजैविकांमध्ये कोणताही दोष नाही तर अ‍ॅलर्जी कशी झाली, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. कुर्ला भाभा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालय संचालिका डॉ. सुहासिनी नागदा यांच्याकडे अहवाल सादर करणार होते. पण हा अहवाल त्यांनी सादर केला की नाही, या अहवालामध्ये काय निदान झाले आहे, याची माहिती अजूनही मिळालेली नाही. (प्रतिनिधी)