शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधा देणार

By admin | Updated: October 10, 2015 01:38 IST

राज्यातील सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर आहे. प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षक अधिकारी व प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक सामग्री

धुळे : राज्यातील सर्व पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर आहे. प्रशिक्षण केंद्रांमधील प्रशिक्षक अधिकारी व प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक सामग्री उपलब्ध केली जात आहे. त्याद्वारे अत्याधुनिक यंत्रणेची ओळख करून दिली जाईल, अशी माहिती राज्याचे प्रशिक्षण व खास पथकांचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी येथे दिली.पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक ४ च्या दीक्षांत समारंभात त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्रांची सद्य:स्थिती, धोरणात्मक निर्णय व भविष्यातील नियोजन याची माहिती दिली.‘पोलीस दलाचा सर्व कारभार आॅनलाइन झाला आहे. सीसीटीएनएस प्रणाली त्याचाच एक भाग आहे. संगणक साक्षरता हा प्रशिक्षणाचा एक भाग असेल,’ असे ते म्हणाले. काही प्रशिक्षकांकडून प्रशिक्षणार्थींना त्रास दिला जातो. त्यांच्याकडून पैसे घेतले जातात, अशा तक्रारी ऐकून आहे. कारवाईच्या भीतिपोटी कुणीही स्वत:हून तक्रार करायला पुढे येत नाही. त्यावर उपाय म्हणून वरिष्ठांकडे थेट आॅनलाइन तक्रार करता येऊ शकते. राज्यातील चार विभागांची सध्या या संदर्भात चौकशी सुरू आहे. अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्याचा अधिकार केंद्राच्या प्राचार्यांना दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रशिक्षणार्थींचा गौरवसुमित सुधाकर इंधाटे, तुषार दिलीपराव इंगळे, प्रदीप नामदेव पवार, अतुल अनिल मोरे, आप्पासाहेब मल्हारी घोडके, सैफनमुलक मोहंमद रफिक नदाफ, गजानन पांडुरंग देसाई, अमोल पंडित भगत यांचा गौरव करण्यात आला.अधिकाऱ्यांमध्ये उपअधीक्षक विलास वामनराव कोहीनकर, पोलीस निरीक्षक मनोहर पगार, राखीव सहायक पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक रामरतन जाधव, तसेच पोलीस उपअधीक्षक राम सोमवंशी यांना गौरवण्यात आले.