शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी इन्फोलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:56 IST

अमलीपदार्थांचे तस्कर आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा आॅन ड्युटी २४ तास वॉच असणार आहे. यासाठी पोलिसांनी बुधवारपासून ‘इन्फोलाइन’ सुरू केली आहे. ९८१९१११२२२

मुंबई : अमलीपदार्थांचे तस्कर आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा आॅन ड्युटी २४ तास वॉच असणार आहे. यासाठी पोलिसांनी बुधवारपासून ‘इन्फोलाइन’ सुरू केली आहे. ९८१९१११२२२ ही इन्फोलाइन सर्वसामान्य नागरिकांसाठी बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. एकेकाळी दारू, सिगरेटच्या असलेल्या क्रेझची जागा चरस, हेरॉईन, गांजा, कोकेन आणि एमडीने घेतली आहे. त्यात चरस, गांजा यांचे धूर हवेत विरघळत असताना एमडीसारखे केमिकलयुक्त ड्रग्ज वाढल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहावयास मिळते. दिवसेंदिवस अमलीपदार्थांचा वाढता वेग, त्यात गुरफटत जाणारी तरुणाई यावर रोख आणणे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. अमलीपदार्थ विरोधी पथकाकडून यावर वेळोवेळी कारवाई केली जाते. पोलिसांनी सुरू केलेल्या या इन्फोलाइनमुळे सर्वसामान्य नागरिक याला जोडले जाणार आहेत. ही इन्फोलाइन २४*७ सुरु राहणार आहे. या इन्फोलाईन सामान्य नागरिक फोन अथवा एमएमएस द्वारे नागरिकांशी जोडले जाणार आहे. त्यांच्या नजरेत अंमली पदार्थ सेवन करणारे अथवा विक्री करणारे आढळल्यास त्यांनी तत्काळ याची इन्फोलाईनवर शेअर करता येणार आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे यावर नियंत्रण असणार आहे. नागरिक आणि अंमली पदार्थ विरोधी पथक एकत्र आल्यास यावर कारवाई करण्यास मदत होईल असा विश्वास मुंबई पोलिसांना आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहत या इन्फोलाईनवर अधिकाधिक माहिती पुरवावी असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)