शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

आभासी विश्वात बालकांचा वावर

By admin | Updated: December 6, 2015 02:17 IST

‘अवघ्या दोन वर्षांचा आमचा बंटी मोबाइलमध्ये विविध गेम खेळण्यात परफेक्ट झाला आहे,’ असे अभिमानाने सांगणारे त्याचे पालक आता मात्र त्याच्या वर्तनामुळे चिंतातुर झाले आहेत.

- प्रशांत तेलवाडकर,  औरंगाबाद

‘अवघ्या दोन वर्षांचा आमचा बंटी मोबाइलमध्ये विविध गेम खेळण्यात परफेक्ट झाला आहे,’ असे अभिमानाने सांगणारे त्याचे पालक आता मात्र त्याच्या वर्तनामुळे चिंतातुर झाले आहेत. कारण, त्याच्यासमोरून मोबाइल, टीव्ही थोड्या वेळासाठी जरी दूर केले तरी तो अस्वस्थ होतो. चिडचिड करीत अनेकदा आक्रमक होतो. त्याच्या हाती खेळणीऐवजी मोबाइल दिल्याने तो आभासी विश्वात हरवल्याची खंत आता त्याच्या पालकांना वाटत आहे.समाजात आज असे अनेक बंटी आहेत. त्यांच्या पालकांना आपल्या बालकातील बदल खटकू लागले आहेत. त्यापैकी काही पालक मानसोपचार तज्ज्ञांकडे येत आहेत, तर अनेक पालक अजूनही त्यांच्या मुलांना आभासी विश्वात वावरूदेत आहेत. आपल्याला लहानपणी जे मिळाले नाही ते सर्व आपल्या मुलांना देण्याचा प्रयत्न पालक करीत असतात. मग बालवयातच त्यांच्या हाती, मोबाइल, लॅपटॉप दिला जातो आणि मुले त्यांचे गुलाम बनतात. काही मुले मैदानी खेळच विसरून जातात. मित्रांबरोबरच मोकळ्या मैदानात खेळण्याच्या वयात मुले एकलकोंडी होतात. मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी अनेक लहान मुले येण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन महिन्यांत २ ते १० वर्षे वयोगटातील १८० केसेस माझ्याकडे आल्या आहेत. त्यात ११२ मुले व ६८ मुलींचा समावेश आहे. त्यातील अनेक जण दिवसातील ५ ते ७ तास टीव्ही बघत असल्याचे आढळून आले. २ ते ३ तासांपेक्षा अधिक वेळ ते मोबाइलवर गेम खेळत असतात. काहींना तर खेळण्यासाठी स्वतंत्र मोबाइल घेऊन दिल्याची धक्कादायक माहिती पालकांच्या संवादातून समोर आली. ही मुले वास्तव जगापासून दूर जात आहेत, यासाठी सर्वप्रथम पालकांनाच समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पालकांनी आपल्या बालकाच्या वर्तन समस्येकडे कानाडोळा केला तर भविष्यात त्यांना व बालकाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागेल, असा इशारा मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. मुले मोबाइलच्या आहारी पाच वर्षांचा एक मुलगा के.जी.मध्ये शिकत आहे. मात्र, तो अनेकदा शाळेत येत नाही. त्याचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. घरी आजी असते. तो रडू नये, बाहेर खेळण्यास जाऊ नये म्हणून त्यास खास मोबाइल विकत घेऊन दिला आहे. तो तासन्तास मोबाइलवर गेम खेळत असतो. अभ्यासाचा कंटाळा करणे, शाळेत वही-पुस्तक अन्य वस्तू हरवणे, मुलांना मारणे, मित्रांमध्ये न खेळणे, सतत स्वमग्न असणे अशी लक्षणे त्याच्यात दिसून आली. शिक्षकांच्या सांगण्यावरून त्याच्या पालकांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे त्याला आणले, असे डॉ. शिसोदे यांनी सांगितले. पालकांनी काय करावे?आई-वडिलांनी मुलांना वेळ द्यावा. घरी आल्यावर पालकांनी स्वत: टीव्हीसमोर जास्त वेळ बसू नये. मोबाइल दूर ठेवावा.शारीरिक व बौद्धिक चालना देणारी खेळणी मुलांना द्यावी. स्वत: त्याच्याबरोबर खेळावे. ठरवून टप्प्याटप्प्याने बालकांचे टीव्ही बघण्याचे, मोबाइलशी खेळण्याची सवय कमी करावी. मुलांना इतर मित्रांसोबत खेळू द्यावे. बालकामध्ये वर्तन समस्या आढळून आल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या, अशी सूचना बाल मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. संदीप सराफ यांनी केली.आजाराची लक्षणेमुलगा एका ठिकाणी एक मिनिटही न बसणे, सतत अस्वस्थ-गोंधळलेला असणे. सहनशक्ती कमी होणे, निरर्थक हालचाली करणे, कोणाचेही न ऐकणे, अतिचंचलता, स्वमग्नता, चिडचिड वाढणेअनेकदा आक्रमक होऊन वस्तूंची आदळआपट करणे आदी लक्षणे मुलांमध्ये दिसून येतात.