शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
2
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
3
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
4
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
5
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
6
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
7
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
8
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
9
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
10
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
11
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
12
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
13
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
14
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
15
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
16
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
17
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

डाळीला महागाईची फोडणी

By admin | Updated: August 21, 2015 01:08 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये तूरडाळ

नामदेव मोरे, नवी मुंबईअच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळात जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये तूरडाळ १२० ते १७० रुपये किलो दराने तर तूर व मूगडाळ १२० रुपये किलो दराने विकली जात आहे. कांद्यापाठोपाठ आता डाळीही सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहावेत यासाठी राज्यातील काँगे्रस व राष्ट्रवादी सरकारने दोन वर्षांपूर्वी डाळींना बाजार समितीमधून वगळण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही दिवस डाळींचे भाव नियंत्रणात राहिले होते. त्यानंतर मात्र डाळीचे भाव वाढतच गेले आहेत. सद्य:स्थितीत मुंबई बाजार समितीमध्ये तूरडाळ १०५ ते १५० रुपये किलो दराने विकली जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १२० ते १७० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. आतापर्यंत सर्वांत स्वस्त दरात उपलब्ध होणाऱ्या मसूरडाळीचे होलसेलचे दर ७८ ते ८५पर्यंत गेले आहेत. किरकोळ मूगडाळीचे दर ८२ ते १०० रुपये झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १२० रुपयांवर गेले आहेत. श्रावण महिना सणासुदीचा असतो. पक्वान्नासाठी चणाडाळीची मागणी वाढलेली असते. गतवर्षी ३४ ते ६० रुपये किलो दराने विकली जाणारी चणाडाळ आता ५० ते ७० रुपयांवर गेली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हे दर ८० रुपयांवर गेले आहेत. तूरडाळ मोठ्या प्रमाणात लातूर, जालना व इतर ठिकाणांवरून विक्रीसाठी येत असते. परंतु गतवर्षी पीक कमी झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.