शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

तीन अपत्यांमुळे अपात्र

By admin | Updated: February 7, 2017 00:08 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तीन अपत्ये असलेल्या गडचिरोलीतील एका उमेदवाराला जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची तात्पुरती परवानगी देण्यास नकार दिला.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी तीन अपत्ये असलेल्या गडचिरोलीतील एका उमेदवाराला जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची तात्पुरती परवानगी देण्यास नकार दिला.अब्दुल जमीर अब्दुल हकीम असे उमेदवाराचे नाव आहे. हकीम व त्यांच्या पत्नी शेख शाहीन परवीन अब्दुल जमीर यांनी न्यायालयात रिट याचिका दाखल करून दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म देणाऱ्या दाम्पत्याला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविणारी तरतूद अवैध असल्याचा दावा केला आहे. या दाम्पत्याला तीन अपत्ये आहेत. हकीम यांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याची तात्पुरती परवानगी देण्याची विनंती केली होती. न्यायालयाने ही विनंती मंजूर केल्यास मूळ याचिकेवर अंतिम निर्णय दिल्यासारखे होईल असे स्पष्ट करून अर्ज खारीज केला. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराची याचिकाहकीम यांना आलापल्ली सर्कलमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे नामनिर्देशनपत्र सादर केले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यात संबंधित वादग्रस्त तरतूद आहे. या तरतुदीनुसार, २००५नंतर दोनपेक्षा अधिक अपत्यांना जन्म देणारे दाम्पत्य निवडणूक लढवू शकत नाही. हा केंद्र शासनाच्या अखत्यारीतील विषय असल्यामुळे राज्य शासनाला असा कायदा करण्याचा अधिकार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.१९९४मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेसोबत झालेल्या करारात भारताने अपत्यांच्या जन्मावर बंधने न लादण्याची हमी दिली होती. त्यानुसार केंद्र शासनाने २०००मध्ये लोकसंख्या धोरण लागू करून सर्व राज्यांना अपत्य जन्माविरुद्ध कायदे न करण्याचे निर्देश दिले होते. असे असताना राज्य शासनाने दोन अपत्यांचे बंधन लागू केले. राज्यघटनेच्या आर्टिकल २५३ अनुसार आंतरराष्ट्रीय कराराशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार केवळ केंद्र शासनाला आहे असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. या याचिकेवर २० फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होईल. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. नितीन मेश्राम व अ‍ॅड. शंकर बोरकुटे यांनी बाजू मांडली.