शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्ट्यांच्या माध्यमातून औद्योगिक प्रदूषण

By admin | Updated: April 4, 2017 03:51 IST

वीटभट्ट्यांना मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड आणि दगडी कोळशाची गरज लागते

सिकंदर अनवारे,दासगाव- वीटभट्ट्यांना मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकूड आणि दगडी कोळशाची गरज लागते. लाकूड आणि दगडी कोळसा व्यावसायिकदृष्ट्या महाग पडत असल्याने महाड औद्योगिक वसाहतीतील हितकरी फॅब्रिक्स या कार्पेट बनवणाऱ्या कारखान्यातील टाकाऊ माल सरळ वीटभट्ट्यांवर जाळण्यासाठी टाकण्यात आला आहे. वीटभट्ट्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषण होत असले तरी या फॅब्रिक्स कारखान्यातील हे कार्पेट वीटभट्टीमध्ये जाळल्यामुळे वायुप्रदूषण अधिक घातक आणि धोकादायक होणार आहे.महाड औद्योगिक वसाहतीमधील हितकरी फॅब्रिक्स नावाचा कार्पेट बनवणारा कारखाना आहे. या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या गाड्यांसाठी आणि घरांमधील वापरण्यासाठी विविध रंगाचे आणि टाकाऊ कार्पेट बनवले जातात. फायबरचा धागा आणि पेट्रोलियमयुक्त गम याचा वापर करून हे कार्पेट तयार केले जात असल्याने या कार्पेटचे विघटन होत नाही. हे कार्पेट जाळल्यास नाकाला झिणझिण्या आणणारा धूर आणि मोठ्या प्रमाणात कार्बन तयार होतो. यामुळे हितकरी कारखान्यामधून निर्माण झालेल्या टाकाऊ फायबरचा अधिक प्रमाणात वापर आणि विघटन होत नसल्याने कारखाना आवार आणि परिसरात पडीक आहे. गेलीअनेक वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळ या टाकाऊ कार्पेटची विल्हेवाट लावण्यासाठी वारंवार कारखान व्यवस्थापकाला सूचना केल्या आहेत. हितकरी फॅब्रिक्समधील हे टाकाऊ कार्पेटचे तुकडे आता तालुक्यातील वीटभट्ट्यांवर पोहचवले जात आहेत. वीटभट्ट्यांचा दर्जेदार वीट तयार करण्यासाठी अधिक वेळ जळणारा घटक लागतो. दगडी कोळसा अधिक काळ जळत असल्याने त्याचा वापर केला जातो. मात्र दगडी कोळशांचा दर जास्त असल्याने तो वीटभट्टी व्यावसायिकांना परवडत नाही. हितकरी कारखान्यांचे हे टाकाऊ कार्पेट दगडी कोळशाप्रमाणे चांगली उष्णता आणि अधिक काळ जळणारा असून या कारखान्याकडून वीटभट्ट्यांवर फुकट पोहच करण्यात येत असल्याने वीटभट्ट्यांवर या कार्पेटचा पर्यायी वापर सुरू झाला आहे. महाड औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या दासगाव खाडी पट्टा, भावे, माटवण, धारवली, वरंध आदी तालुक्यातील ठिकाणी वीटभट्ट्यांवर हे टाकाऊ कार्पेट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीटभट्ट्या जाळण्यासाठी कार्पेटच्या वापरावर बंदी घातली असून हितकरी कारखान्याला हा आगाऊ माल वीटभट्ट्यांवर उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. अद्याप या कारखान्याने हे कार्पेट न उचलता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे ग्रामीण भागातील वीटभट्ट्यांच्या माध्यमातून औद्योगिक प्रदूषणाला प्रारंभ होणार आहे.>प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून वीटभट्ट्यांची पाहणी केली आहे. हितकरी कारखान्यामधील टाकाऊ कार्पेट वीटभट्ट्यांवर आढळून आले. अशा प्रकारे विल्हेवाट लावणे हे प्रदूषणकारक आहे. हितकारी कारखान्याचा हा प्रकार सराईत असण्याने या कारखान्यावर वरिष्ठ कार्यालयाकडे बंदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.- अमित लाटे, क्षेत्र अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ महाड