शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘इंद्राणीने बहिणीसारखे नव्हे, तर मुलीप्रमाणे वागवावे’

By admin | Updated: December 18, 2015 01:06 IST

इंद्राणी मुखर्जीने बहिणीप्रमाणे न वागवता मुलीप्रमाणेच वागवावे, अशी शीनाची खूप इच्छा होती. इंद्राणीच्या बहिणीचे सोंग तिला करायचे नव्हते. इंद्राणी विधीला

मुंबई : इंद्राणी मुखर्जीने बहिणीप्रमाणे न वागवता मुलीप्रमाणेच वागवावे, अशी शीनाची खूप इच्छा होती. इंद्राणीच्या बहिणीचे सोंग तिला करायचे नव्हते. इंद्राणी विधीला (संजीव खन्ना आणि इंद्राणीची मुलगी) मुलगी म्हणून वागणूक देत होती आणि हे शीनाला खटकत होते. तिला अत्याचार झाल्यासारखे वाटत होते, असे शीनाचा प्रियकर राहुल (पीटर मुखर्जीचा मुलगा) याने दंडाधिकाऱ्यांपुढे नोंदवलेल्या जबाबात सांगितले. त्याच्या जबाबाची प्रत गुरुवारी बचावपक्षाच्या हाती पडली. दरम्यान, २०१२मध्ये शीनाने पुढील शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यासंदर्भात तिने इंद्राणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. २४ एप्रिल २०१२ रोजी राहुलने शीनाला वांद्रे येथील राहत्या घरी सोडले. त्याच दिवशी शीना इंद्राणीला भेटली. त्यानंतर राहुलने शीनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र शीनाने उत्तर दिले नाही. त्याने इंद्राणीला संपर्क केल्यावर इंद्राणीने राहुलला तिला (शीना) कोणीतरी भेटले आहे. पुढील दोन महिने तिला त्याच्याशी संपर्क करायचा नाही, असे सांगितल्याचेही तो म्हणाला.शीनाला शोधण्यासाठी राहुल पीटरच्या घरी गेला. मात्र तिथेही शीना त्याला भेटली नाही. त्यामुळे राहुलने थेट पोलीस स्टेशन गाठले. मात्र पोलिसांनी शीना आईबरोबर असल्याने आणि त्या दोघांचे लग्न झाल्याने काळजी करू नका, असा सल्ला राहुलला दिला. शीनाबाबत इंद्राणी वेगवेगळी कहाणी सांगत असल्याने राहुलला तिच्यावर संशय आला. त्याने पोलीस अधिकारी परमवीर सिंह आणि शीनाचे बॉस शुभोदॉय मुखर्जींची भेट घेतली. मुखर्जींनी त्याला शीना हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्याची सूचना केली. मात्र पोलीस तक्रार घेण्यास तयार नव्हते.मुंबई मेट्रोचे ह्युमन रिर्सोसेस विभागाचे मुख्य शुभोदॉय मुखर्जी यांच्या म्हणण्यानुसार, २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाने वेळेच्या आधीच कार्यालय सोडले. त्यानंतर तिने कधीच रिपोर्ट केला नाही. ‘मी माझ्या आॅफिस बॉयला तिच्या घरी पाठवले. त्याने शीना घरात नसून तिचा मित्र (राहुल) घरात असल्याचे सांगितले. मी त्याला शीनाच्या मित्राला तिचा ठावठिकाणा विचारण्यासाठी पाठवले. परत आल्यावर आॅफिस बॉयने तिच्या मित्रालाही तिच्या ठावठिकाण्याविषयी माहीत नसल्याचे सांगितले,’ असे मुखर्जी यांनी दंडाधिकाऱ्यांना सांगितले.त्यानंतर मुखर्जींनी आॅफिस बॉयला शीनाचा लॅपटॉप आणायला सांगितले. काही दिवसांनी त्याला राहुल भेटायला आला. इंद्राणी शीनाला राहुलबाबत काहीतरी बोलली असावी, त्यामुळे ती परत येत नाहीये, असा संशय राहुलने मुखर्जींकडे व्यक्त केला. त्याचप्रमाणे शीना माझी मुलगी नाही, तर बहीण आहे, असे तिने ठामपणे मुखर्जींना सांगितले. शीना दुसरीकडे गेली असून, तिला काही महिने कोणाशीही संपर्क करायचा नाही, असे इंद्राणीने मुखर्जींना सांगितले. शीना कुरिअरद्वारे राजीनामा पाठवत आहे, असेही इंद्राणीने सांगितले. दुसरीकडे पीटरच्या इमारतीचा व्यवस्थापक मधुकर किलजे यांनी २३ एप्रिल २०१२ ते २५ एप्रिल २०१२ या कालावधीत इंद्राणी आणि तिचा ड्रायव्हर श्यामवर राय हे सातत्याने घराबाहेर जात आणि पुन्हा घरी येत, असे दंडाधिकाऱ्यांना जबाबात सांगितले. २४ आॅगस्ट २०१२ ला इंद्राणीने विधीच्या नावे बक्षीसपत्र तयार केले आणि २७ आॅगस्टच्या मिटिंगमध्ये सादर करण्यास सांगितले. इंद्राणीच्या कोठडीत ४ जानेवारीपर्यंत वाढ न्यायालयाने सुनावणी ४ जानेवारीपर्यंत तहकूब करत इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांच्या न्यायालयीन कोठडीत ४ जानेवारीपर्यंत वाढ केली.इंद्राणीने राहुल आणि शीनाला केले वेगळेमार्च २००९मध्ये इंद्राणी आणि तिचा सहकारी राहुलच्या फ्लॅटवर जाण्यापूर्वी पीटरने राहुलला सांगितले की, इंद्राणी येथे त्यांना (शीना आणि राहुल) वेगळे करण्यासाठी येणार आहे. त्याप्रमाणे इंद्राणीने खरोखरच शीना आणि राहुलला वेगळे केले. त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी शीनाने राहुलशी संपर्क करत ती बंंगळुरूला असल्याची माहिती दिली. ‘शीनाने मला ती बंगळुरूमध्ये तिचा आधीचा प्रियकर कौस्तुभबरोबर राहत असल्याचे सांगितले. तो तिच्याबरोबर पुन्हा एकदा प्रेमाचे संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र तिला त्याच्याबरोबर राहायचे नव्हते. एके दिवशी त्याने शीनाच्या पायावर बीअरची बाटली फेकून मारली,’ असे राहुलने दंडाधिकाऱ्यांना सांगितले.