शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वैजापूरची इंद्रध्वज गुढी

By admin | Updated: June 1, 2015 02:55 IST

स्मशानभूमीत नुकत्याच दहन केलेल्या जागेवर ही पूजा केली जाते. ती जागा शेणाने सारवली जाते. या जागेत १२ महिन्यांचे १२, चार दिशेचे ४, राजा व प्रजाभाग २ असे एकूण १८ छोटे खड्डे केले

विजय गायकवाडरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरात गेल्या $४०० वर्षांपेक्षा जास्त काळापासून इंद्रध्वज गुढी उभारण्याची परंपरा आहे. यावरूनच येणाऱ्या वर्षाचे पिकांसह पाऊसपाण्याचे आडाखे बांधले जातात. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी येथील स्मशानभूमीत ही गुढी उभारली जाते. मराठी माणसाच्या नववर्षाच्या येणाऱ्या वर्षभरातील पीकपाणी कसे राहील? कोणत्या वस्तूची तेजी-मंदी राहील? हा काळ राज्यकर्ते व प्रजेसाठी कसा राहील, असे भविष्य यावरून वर्तविण्यात येते. पोलीस पाटलांसह माली पाटील, पुरोहित व गावकरी मंडळी शहराच्या पश्चिम दिशेला असलेल्या स्मशानभूमीत जमा होतात. स्मशानभूमीत नुकत्याच दहन केलेल्या जागेवर ही पूजा केली जाते. ती जागा शेणाने सारवली जाते. या जागेत १२ महिन्यांचे १२, चार दिशेचे ४, राजा व प्रजाभाग २ असे एकूण १८ छोटे खड्डे केले जातात. यामध्ये प्रत्येकी २१-२१ ज्वारीचे दाणे टाकले जातात. नंतर त्यावर रुईच्या पानावर महिन्याचे नाव लिहून महिन्याच्या व इतर खड्ड्यांवर ठेवली जातात. या जागेच्या उत्तर दिशेला ज्वारीची रास घालून त्यावर मातीची ३ मडकी एकावर एक पाण्याने भरून ठेवली जातात. त्या मडक्याच्या तोंडावर रुईची पाने ठेवली जातात. ही विधिवत पूजा पोलीस पाटील व माली पाटील यांच्या हस्ते परंपरेने चालू आहे. या पूजेला इंद्रध्वज पूजन म्हणतात. या इंद्रध्वजाची रात्रभर राखण केली जाते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयापूर्वी माली पाटील यांच्या घरून सप्त धान्याचा नैवेद्य आणण्यात येतो. कावळा नैवेद्य घेऊन ज्या दिशेने जातो त्या दिशेला दुष्काळ राहील असे समजले जाते, तर इतर दिशेला मध्यकाळ राहील असे मानतात. म्हणजेच पर्जन्यमान व पीकपाणी चांगले राहील असे गृहीत धरले जाते. आदल्या दिवशी झाकून ठेवलेली सर्व खड्ड्यांवरील रुईची पाने काढली जातात. ज्या महिन्याच्या वरील पाने ओली निघतात त्या महिन्यात पाऊस चांगला, तर पाने कोरडी निघतात त्या महिन्यात मध्यम किंवा कमी स्वरूपाचा पाऊस पडेल असा अनुमान काढण्यात येतो. नंतर प्रत्येक महिन्याच्या खड्ड्यातील ज्वारीचे दाणे मोजले जातात. हे दाणे रात्रीतून कमी वा अधिक होतात असे जाणकार सांगतात. ज्या महिन्यातील दाणे जास्त त्या महिन्यात उद्योग, व्यवसाय, व्यापारात मंदी, तर दाणे कमी त्या महिन्यात तेजी असे समजले जाते. ज्या दिशेच्या खड्ड्यात दाणे वाढतात त्या दिशेला स्वस्ताई, तर ज्या दिशेला दाणे कमी होतात तिकडे महागाई असते. राजभागातील दाणे घटल्यास राज्यकर्त्यांना, राजसत्तेला अनिष्ट, प्रजाभागाचे दाणे घटल्यास प्रजेला अनिष्ट समजले जाते.