शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

भारत-अमेरिका पोलिसांची कार्यशाळा

By admin | Updated: April 29, 2016 06:02 IST

अद्ययावत माहिती व मार्गदर्शन आता देशभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.

जमीर काझी,

मुंबई- आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीबाबतचे कायदे व अमेरिकेबरोबर असलेल्या प्रत्यार्पण कराराबाबतची अद्ययावत माहिती व मार्गदर्शन आता देशभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले जाणार आहे. त्यासाठी येत्या १८ मे रोजी मुंबईत भारत व अमेरिकेच्या संयुक्त विद्यमाने विभागीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे.या दोन दिवसीय कार्यशाळेत देशातील ८ राज्यांतील सुमारे ८० पोलीस अधिकारी सहभागी होणार आहेत. अशा प्रकारे पहिल्यांदाच होत असलेल्या या कार्यशाळेच्या प्रस्तावाला गृह विभागाने हिरवा कंदील दिला आहे.दोन्ही देशांतील गुन्हेगारी जगतातील ‘मोस्ट वॉण्टेड’ गँगस्टर, अतिरेकी संघटनांचे हस्तक, तस्करी व अमलीपदार्थांची आयात व विक्री करणारे गुन्हेगार यांना परस्पर देशांच्या ताब्यात देणे तसेच त्यासंबंधीचा प्रत्यार्पण करार व कायद्याची माहिती या परिषदेत अधिकाऱ्यांना विस्तृतपणे दिली जाईल, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गेल्या काही वर्षांत भारतात अतिरेकी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे तस्करी व अमलीपदार्थांची आयात करणारे गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर परदेशात पलायन करण्याचे प्रमाण वाढले आहे. या गुन्हेगारांविरुद्ध देशविघातक कृत्ये व अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे निर्धारित मुदतीत त्यांचा शोध न लागल्याने त्यांना फरार घोषित करून कालांतराने ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजाविली जाते. संबंधित आरोपी परदेशात असल्यास त्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्रीय गृह विभाग व परदेशातील दूतावासाशी संपर्क साधून अनेक कायदेशीर व तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. अशा प्रकारच्या केसेसमध्ये अमेरिकेबरोबर असलेल्या कराराची माहिती व मार्गदर्शनासाठी उभय देशांतील अधिकाऱ्यांची राष्ट्रीय स्तरावर संयुक्त कार्यशाळा घ्यावी, असा प्रस्ताव मुंबई पोलिसांकडून बनविण्यात आला. पोलीस महासंचालकांमार्फत तो गृहविभागाकडे पाठविण्यात आला होता. येत्या १८ व १९ मे रोजी मुंबईत ही कार्यशाळा घेण्यास गृह विभागाने अनुमती दिली आहे. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या देशातील ८० अधिकाऱ्यांच्या निवास, भोजन व वाहतूक व्यवस्थेसाठी सुमारे साडेआठ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.