शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरा, रमाई घरकूल योजनेला फाटा!

By admin | Updated: December 18, 2015 01:18 IST

इंदिरा घरकूल योजना, रमाई योजनेला फाटा देऊन दारिद्र्य रेषेखालील बेघरांसाठी आता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे घरकूल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना सुरू करण्याचा

- यदु जोशी,  नागपूरइंदिरा घरकूल योजना, रमाई योजनेला फाटा देऊन दारिद्र्य रेषेखालील बेघरांसाठी आता पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावे घरकूल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दीनदयाळ उपाध्याय हे जनसंघाचे नेते होते. ते एकात्म मानवतावादाचे प्रणेते मानले जातात.सध्या केंद्र सरकारच्या इंदिरा घरकूल योजनेंतर्गत घराच्या जागा खरेदीसाठी २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील बेघरांपैकी ज्यांच्याकडे स्वत:ची जागा नाही, असे कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मात्र, ग्रामीण भागातील जागेचे दर विचारात घेता, २० हजार रुपयांमध्ये घरकुलासाठी जागा खरेदी करण्यास अपेक्षित प्रतिसादच मिळाला नाही. जागेअभावी इंदिरा घरकूल योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित असलेल्या लाभार्र्थींची संख्या दोन लाखांच्या वर आहे. त्यामुळे ही योजना अपयशी ठरली. सामाजिक न्याय विभागाची रमाई घरकूल योजना, आदिवासी विकास विभागाची शबरी घरकूल योजना या राज्य पुरस्कृत योजनेमध्येदेखील, मोठ्या प्रमाणात पात्र लाभार्र्थींना केवळ जागेअभावी घरकूल योजनेचा लाभ देता येत नाही. घरकूल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना जागा खरेदीसाठी अतिरिक्त अर्थसाहाय्य देण्याची योजना म्हणून, आता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकूल जागा खरेदी अर्थसाहाय्य योजना राबविली जाईल. ही योजना इंदिरा, रमाई व शबरी घरकूल योजनेतील दारिद्र्य रेषेखालील घरकूलपात्र, परंतु घरकूल बांधकामासाठी जागा नसलेल्या लाभधारकांना लागू राहील.